शॉन हेपबर्न फेरर लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने डॉ. विनिता महाजनी यांनी ‘मून रिव्हर ऑड्री हेपबर्न’ हा अनुवाद प्रकाशित केला आहे. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला. सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमासाठी आशय फिल्म क्लबचे सचिव सतीश जकातदार, चित्रपट अभ्यासक विलास पाटील, लेखिका डॉ. विनिता महाजनी आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका देवयानी अभ्यंकर कुलकर्णी उपस्थित होत्या.
डॉ. मोहन आगाशे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, हॉलिवुडची अभिनयसम्राज्ञी ऑड्री हेपबर्न उत्कृष्ट, संयत अभिनयाचा अस्सल नमुना आहे. एका मुलाने आईविषयी भावनेने लिहिलेले पुस्तक एवढंच या पुस्तकाचं महत्त्व नाही तर या पुस्तकाच्या माध्यमातून सृजनशील क्षेत्रात वावरणारी आई आणि तिचा संवेदनशील मुलगा यांच्यातील नातं सुंदररीत्या उलगडत गेले आहे.
लेखिका विनिता महाजनी यांनी पुस्तकनिर्मितीबाबतची भूमिका व्यक्त केली. देवयानी अभ्यंकर यांनी प्रकाशकीय प्रास्ताविक केले.