Book Categories


जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्वागतासाठी "सुहासिनी"असतेस,
वाढतांना "यक्षिणी"असतेस,
भरवतांना "पक्षिणी" असतेस,
साठवतांना "संहिता" असतेस,
भविष्‍याकरता "स्वप्नसती" असतेस.
....संसाराच्या दहा फुटी खोलीत
दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी
तुझी किमया
मला अजूनही समजलेली नाही.

विंदांची ही 'झपताल ' कविता स्त्री मधल्या वेगवेगळ्या छटा आणि ती पार पाडत असलेल्या अनेकविध भूमिकांबद्दल अत्यंत कृतज्ञ भावनेने भाष्य करते . देवाने एक स्त्री म्हणून जन्म दिलाय याचं सार्थक वाटावं अशीच माणसं भेटत राहिली . या माणसांचेही आज मला खूप मनापासून आभार मानावेसे वाटतात .
याच बरोबर मानवी शरीरातील डावा मेंदू व इडा नावाची नाडी हि स्त्री तत्वाची असते तर सुषुम्ना नाडी हि अर्ध नारी नटेश्वर म्हणजेच स्त्री पुरुष दोन्ही तत्वांची असते . एकूणच काय तर हे स्त्रीतत्व स्त्री व पुरुष दोघांमध्येही अस्तित्वात असते . या स्त्री तत्वामुळेच मानवाच्या ठायी संवेदनशीलता , क्षमाशीलता व सहनशीलता या भावना अस्तित्वात असतात .आज महिला दिना निमित्त समस्त मानवजातीतील या स्त्री तत्वाला सलाम करते , यावरून समजते कि ,
निसर्गानेच स्त्री पुरुष समानतेचा समतोल राखलेला आहे . मग आपण भेदभाव करणारे कोण ?
इथे कुसुमाग्रजांची एक ओळ आठवते कि

" देवी म्हणुनी पुजू नका
वा दासी म्हणुनी हिणवू नका "

थोडक्यात काय तर स्त्री ला एक human being म्हणूनच treat करा . म्हणजे
स्त्री सबलीकरणा सोबतच ( women empowerment) संपूर्ण मानव जातीचे सबलीकरण (human empowerment) देखील उत्तम रित्या साध्य होईल .

- तन्वी टापरे