Book Categories


Waiting

Waiting

आज कित्येक वर्षांनी Samuel Beckett च्या ' waiting for godot ' या absurd drama ची आठवण झाली . absurd म्हणजे खरंतर विसंगत ; तर यातील दोन पात्र, 'गोदो' नामक कोणी तरी येतंय त्याची वाट पाहत बसलेत . तो नक्की देव आहे ,कि guide आहे , कि त्यांचा मित्र वा नातलग आहे याचा काहीही उल्लेख नसताना या waiting period मध्ये ज्या काही फिक्कट घडामोडी ( ठळक म्हणण्यासारखं खरंच काही घडत नाही ) घडतात त्याचं चित्रण म्हणजे हे नाटक . जो कधी येतंच नाही त्याच्या साठी वाट पाहणं हि एक मोठी विसंगती यातून लेखकाने खूप सुंदर आणि साधेपणाने चित्रित केलीये . यातील कथे पेक्षाही यातलं ' वाट पाहणं' जास्त भावतं .

actually मला या नाटकाबद्दल लिहायचं नसून 'वाट पाहणं ' याबद्दल लिहायचंय. आपल्याला हवीशी किंवा अपेक्षित घटना खरंच घडणार आहे कि नाही हे किंवा आपली ध्येयपूर्ती होणारे कि नाही हे या पृथ्वीतलावर कुणालाच माहिती नाहीए , परंतु युगानुयुगे , जन्मोजन्म , पिढ्यानपिढ्या ही जीवसृष्टी कशाची न कशाची वाट पाहत आहे , आपल्या ध्येयपूर्ती च्या वाटे कडे डोळे लावून बसली आहे , आणि आपली अपेक्षित ध्येयपूर्ती व्हावी म्हणून त्या वाटेवर वर्षानुवर्षे चालत आहे .

अगदी कॉल वेटिंग पासून ते हॉटेल मधले वेटिंग पर्यंत आणि गाणी, काव्यातील 'इंतजार' पासून ते जीवनातल्या अनेक टप्प्यांमधील हि वाट पाहण्याची प्रोसेस कधी आशादायी तर कधी वेडी, खोटी आशा दाखवणारी , कधी कंटाळवाणी रटाळ तर कधी रम्य , कधी कडू गोड आठवणी देणारी ,तर कधी खूप काही शिकवणारी अशी जर्नी आहे . हि जर्नी , हा प्रवास तितकाच प्रवाही व्हायला हवा. ,वाटेत येणाऱ्या सर्व खाचखळग्यांना पार करत जाणारा व्हायला हवा. तर त्या waiting ची मजा घेत पुढे जाता येईल.

खरोखर ' waiting ' , 'वाट पाहणे' 'इंतजार' हा आपल्या आयुष्यातला ' ray of hope ' म्हणता येईल . आपल्या ध्येया पर्यंत पोहोचे पर्यंत आपण जे कष्ट वा प्रयत्न करतो ती आपल्या प्रतिक्षेमधील एक learning process आहे. तसेच ही वाट पाहण्याची प्रक्रिया म्हणजे मानवाला पूर्णत्वाच्या ओढीपोटी लागलेली अपूर्णतेची गोडी आहे . आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील हा waiting period खरंतर कधी संपतच नाही , कारण आयुष्यातील ध्येये आणि अपेक्षा या सतत कालानुरूप बदलत राहतात आणि जोपर्यंत याला अंत नाही तोपर्यंत ' waiting ' किंवा 'वाट पाहणं' हे या सृष्टीच्या अंतापर्यंत असलेले 'शाश्वत सत्य' आहे आणि राहील . म्हणूनच कदाचित म्हणलं असेल ना ,
" इंतजार का फल मिठा "
- तन्वी .<>