१० सप्टेंबर २०१७, रविवार रोजी अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय (सातारा) यांच्यातर्फे ‘अक्षरगौरव’ साहित्य पुरस्कार देण्यात आले. या समारंभात कॉन्टिनेन्टल परिवारातील सुप्रसिद्ध लेखक श्रीनिवास भणगे यांच्या ‘नाट्यलेखन’ या पुस्तकाला पुरस्कार देण्यात आला. सुप्रसिद्ध नाटककार अभिराम भडकमकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. इतिहासाचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रस्तुत कार्यक्रमाला कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका देवयानी अभ्यंकर उपस्थित होत्या.