नल दमयंती या पुराणकाळातील आदर्श जोडप्याचे सहजीवन हा या कादंबरीचा विषय आहे. आकर्षक भाषाशैली हा या कादंबरीचा खास विशेष आहे. नल दमयंतीची कथा आजच्या काळातील तरुण वर्गापर्यंत चांगल्या अर्थाने पोहोचावी, स्त्री-पुरुषांचे सहजीवन म्हणजे काय? याचे प्रत्यक्ष दर्शन वाचकांना घडावे, या हेतूने कौमुदी प्रताप यांनी ‘सहचरी’ ही कादंबरी लिहिली आहे. ओघवत्या शैलीतील ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते.