New product
Warning: Last items in stock!
Availability date:
झाशीच्या राणीचे जीवन हे एखाद्या महाकाव्याप्रमाणे आहे. पण या महाकाव्यात स्त्रीने अबला म्हणून जगणे तिला पसंत नाही. सीता, शकुंतला, द्रोपदी यांच्यासारखे पुरुषांच्या पाठीमागे फरफटत जाणे तिने स्वीकारले नाही. प्रत्येक संकटांना ती धीरोदात्तपणे सामोरी गेली. राणीच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक कंगोरे आहेत.
राणीचे व्यक्तिमत्त्व पहिल्यापासूनच बंडखोर व्यक्तिमत्त्व आहे. तिने पारंपारिक रूढींना बरेचदा झुगारूनदेखील दिले आहे. त्यामुळे अनेकदा ती टीकेची धनीदेखील झाली आहे. अनेकांनी सतत शंभर वर्षे इंग्लंडकडून मार खात आलेल्या फ्रेंच लोकांच्यात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या ‘जोन ऑफ आर्क’ म्हणून राणीचा गौरव केला आहे. राणीने जोन ऑफ आर्कप्रमाणेच आपला लढाऊ बाणा कधी सोडला नाही. म्हणूनच ती पुढच्या स्वातंत्र्यलढ्यातही अनेकांचे प्रेरणास्थान राहिली. अगदी अग्निशिखेसारखी !!
Weight | 0.625 Kgs |
Book Size | Demi |