चरित्र

चरित्र

कोणत्याही व्यक्तीचं चरित्र लिहिणे ही एक वेगळी लेखनकला आहे. कारण त्या व्यक्तीकडे लेखकाला माणूस म्हणून तटस्थतेनं बघता येणं हे जमायला लागतं. मगच त्याच्यातले गुण अवगुण समजून घेऊन त्या व्यक्तीचं शब्दरेखाटन करता येतं. चरित्रलेखन म्हणूनच अजिबात साधं सोपं नाही. सर्वसामान्याचं चरित्र लिहिणंही कठीण आणि असामान्यांचं तर अधिक अवघड. कारण असं की, सर्वसामान्य व्यक्तीतलं असामान्यत्व आणि असामान्य व्यक्तीतलं सामान्यत्व यांचा तोल राखून चरित्रलेखन करणं यासाठी विशेष लेखनकौशल्य लेखकाकडे असणं गरजेचं असतं. अशा लेखकांनी लिहिलेली चरित्रेच अधिक करून वाचकांच्या पसंतीस उतरतात. आमच्या संस्थेने प्रकाशित केलेली जी महत्त्वाची चरित्रे प्रकाशित केली आहेत त्यात दोन प्रकार आहेत. एक म्हणजे व्यक्तीचा केवळ चरित्रपट सांगणारे चरित्र आणि दुसरा प्रकार त्या व्यक्तीसंबंधित आठवणी गोष्टी सांगणे हा होय. ‘आत्मसिद्धा’ (निर्मलाताई पुरंदरे) ‘ध्रुवाचा तारा’ (बाबासाहेब आंबेडकर), ‘मानवतेचा महापुजारी’ (विवेकानंद), ‘बेगम अख्तर’, ‘प्रेरणापुरुष’ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी), पंतप्रधान नरेंद्र मोदी (अनुवादित) यांसारखी चरित्रे त्यात्या व्यक्तीचा संपूर्ण कार्यकर्तृत्वाचा जीवनपट वाचकांसमोर उभा करतात.

‘अमेझिंग चाईल्ड सायली’ सारखे तिच्या आईने लिहिलेले चरित्र सायलीसारख्या विशेष मुलांच्या आयांना प्रेरक आहेच तसंच ते सर्वसामान्य वाचकांनाही काही एक दिशा देणारं आहे. ‘गंधार निषाद’, ‘प्रिन्स चार्मिंग’, ‘किशोर कुमार’, ‘मधुबाला’, ‘निळू फुले’ यांसारखी आठवणी सांगणारी छोटेखानी चरित्रे वाचकांना आवडणारी आहेत.

आणखीही अनेक चरित्रं कॉन्टिनेन्टलच्या ग्रंथदालनात आहेत. त्यांपैकी काही निवडक चरित्रांची ओळख वाचकांना करून दिली आहे.

आत्मसिद्धा या चरित्रातून ज्येष्ठ समाजसेविका निर्मलाताई पुरंदरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा मोठा पट माणिक कोतवाल यांनी सांगितला आहे. निर्मलाताईंचे कार्य, त्यांच्या वनस्थळी या संस्थेचा जीवनपट यांची अतिशय सुसूत्र मुद्देसुद मांडणी लेखिकेने केली आहे. लोकांना उत्साह आणि प्रेरणा देणाऱ्या चरित्रांमधील ‘आत्मसिद्धा’ हे महत्त्वाचे चरित्र म्हणता येईल. सुनील चिंचोलकर लिखित मानवतेचा महापुजारी हे विवेकानंदांचे चरित्र केवळ भावगर्भतेने लिहिलेले नाही तर संशोधनाच्या शिस्तीने पण आपुलकीने लिहिलेले हे चरित्र आहे. बेगम अख्तर हे सुरेशचंद्र नाडकर्णी आणि लता देव यांनी लिहिलेले चरित्र एखाद्या विचारगर्भ गजलेसारखे देखणे आणि भारदस्त झाले आहे. गजलप्रेमींबरोबरच सर्वसामान्य रसिकांनाही हे चरित्र नक्कीच आवडल.

अशी अनेक चांगली चरित्रे कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या ग्रंथदालनात आहेत. वाचकांनी आमच्या या संकेतस्थळावरील ग्रंथदालनाला आवर्जून भेट द्यावी. तुमच्या आवडीची अनेकानेक पुस्तके या ग्रंथदालनात तुम्हाला मिळतील.