या पुस्तकात जेमतेम चार ओळींच्या कथासूत्रापासून पूर्ण लांबीच्या दोन तासांच्या चित्रपटाची पटकथा व संवाद कसे लिहिले जातात, याचं प्रत्यक्ष प्रमाण वाचकांना मिळणार आहे.
कृत्रिम गर्भधारणा या एका धाग्यात गुंफलेल्या नव्या युगाच्या या नवीन कथा कृत्रिम गर्भधारणेमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या प्रश्नांची एक चुणूक मनोरंजक पद्धतीने दाखवून जातात..
‘खऱ्या-खुऱ्या गोष्टी’ या कथा संग्रहाचे शीर्षक यथार्थ आहे. त्यातली प्रत्येक गोष्ट खरी आहे. यातल्या अनेक कथा हृदयस्पर्शी आहेत. नीलाताईंच्या मते त्यांना भेटलेल्या प्रत्येक माणसाची एक कथा आहे.
आजच्या काळातील राज्यकर्ते, तरुण, बाल, माता या सर्वांच्या दृष्टीने ‘शिवकालीन दंतकथा’ हे पुस्तक संस्कार करणारे पुस्तक आहे. शिवाजी महाराज हे एक बहुआयामी आणि देवत्व लाभलेले पुरुषोत्तम होते. अशा नरोत्तम राजाच्या गुणांचा संस्कार प्रत्येक पिढीवर व्हावा हा हेतू या पुस्तकलेखनाचा आहे.
वि. स. खांडेकर मराठी साहित्यातलं जुनं जाणतं बुजुर्ग व्यक्तिमत्त्व. मराठी भाषेचे वैभव ज्यांना जाणून घ्यायचे आहे तसेच जुन्या मराठी भाषेची गोडी ज्या वाचकांना चाखायची आहे त्या सर्व रसिकवाचकांना ‘पाषाणपूजा’ हा कथासंग्रह आवडेल.