शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप

भूमंडळी

कॉन्टिनेन्टल प्रकाशन परिवारातर्फे छत्रपती शिवरायांना सादर वंदन

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

११ मार्च २०२० छत्रपती संभाजीराजे स्मृतिदिन सादर नमन

कॉन्टिनेन्टल प्रकाशित छत्रपती संभाजी महाराजांवरील महत्त्वपूर्ण पुस्तके

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

आवर्तन            

आपल्या हिंदू संस्कृतीत आवर्तन या संकल्पनेला नेहमीच खूप महत्व दिलेलं आहे .हिंदुस्थानी संगीतात  आवर्तन असते. तसेच एखादा मंत्र, स्तोत्र याचेही आवर्तन असते. परंतु आज मला आणखी एका महत्वाच्या आवर्तनाविषयी लिहायचे आहे

'आवर्तन' म्हणजे काय तर  एक चक्र, जिथे आरंभ  नाही, अंत नाही, जे चक्र सतत भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही काळातअविरतपणे सुरु आहे. जसं कि, आपल्या निसर्गातील ऋतुचक्रउन्हाळा -पावसाळा-हिवाळा देखील युगानुयुगे पुन्हा पुन्हा सुरु आहे . पाण्याच्या वाफेचे ढग होऊन पुन्हा ढगातून पावसाच्या रूपाने पाणी जमिनीवर येते. यातही सातत्य आहे, आणि यालाही अंत नाही. झाडापासून बी होते, पुन्हा बी पासून झाड, त्याचप्रमाणे, जसं आपण लहानपणी कोंबडी आधी  कि अंड आधी असं  कोडं घालायचो, त्याप्रमाणेच या चक्राचा  सुरुवात आणि शेवट शोधायचं म्हणलं तर खरंच अशक्यप्राय आहे. 

तसंच जन्म - मृत्यूचे चक्र देखील अविरतपणे सुरु आहे. आपल्या आत्म्याचाआरंभ हि कोणी सांगू शकत नाही आणि अंतही नाही . आपल्या आत्म्याचे अस्तित्वकाल हि होते, आजही आहे, अन उद्याही असणार आहे. आपण युगानुयुगे जन्मघेतोय, बाल्यावस्था , कुमारावस्था, तारुण्य, वार्धक्य या सर्वअवस्थांतून जाऊन हा देह सोडतो आहे , मग पुन्हा दुसरा देह धारण करून, पुन्हा याच चार अवस्थांची पुनरावृत्ती होते आहे. 

 काळालादेखील कालचक्र असेच म्हणलंय, भूतकाळ तर आहेच, परंतु वर्तमान आणिभविष्याचा देखील कधी ना कधी भूतकाळ होतो व जसा वर्तमान व भविष्याचे रूपांतरभूतकाळात होत जाते तसं नवीन वर्तमान व भविष्यकाळ येतंच राहतो, हि काळाचीपुनरावृत्ती देखील अनेक युगे सुरूच आहे, हे सर्वात मोठे काळाचे आवर्तन आहे

 या आवर्तनात आपण सर्वच गुंतलेलो आहोत, हेएखाद्या कोड्याप्रमाणे आहेयाचा अंत आपल्याला माहिती नाही  म्हणूनच हे  आवर्तन अपूर्ण आहे    हे आवर्तन  भेदून याच्या पल्याड ईशावास्य उपनिषदात  वर्णन केलेले पूर्णत्व आहे जे  कधी वाढतही नाही वा घटत ही नाही, ते स्थिर आहे. 

शेवटी आपल्या सारख्या सामान्य मानवाला  हे आवर्तन भेदणं कठीण असलं तरी, ज्ञान  (wisdom)  आणि ध्यानाच्या (meditation) च्या  साथीने निदान आपणया पूर्णत्वाच्या (completeness) मार्गावर एखादे पाऊल तरी  टाकूनआत्मज्ञानाची enlightenment  अनुभूती नक्कीच घेऊ शकतो.

- तन्वी टापरे

याविषयासाठी उपयुक्त आणि मार्गदर्शनपर ठरतील अशी दोन पुस्तकं कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केली आहेत.

आत्ता नाही तर केव्हा…? - स्मिता जयकर

Atta nahi

साधनेच्या सोपानाने ईश्र्वरी सत्याकडे जाताना आलेले आत्मानुभव स्मिता जयकर यांनी अतिशय भावपूर्णतेने या पुस्तकातून सांगितले आहेत. स्वत:कडे बघण्याची दृष्टी बदलेल असा विश्र्वास त्या या पुस्तकातून वाचकाला देतात. सकारात्मकता निर्माण करणारे हे पुस्तक आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्र्चात जीवन

Mrutupaschat

पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आणि एनर्जी हीलर म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. मेधा खासगीवाले यांचे हे पुस्तक आयुष्य खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण कसं जगता येऊ शकते याविषयीचं चिंतन मांडणारं आहे. माणसाचं अस्तित्व आणि त्याचे दृष्य-अदृष्य पैलू तसंच मृत्युनंतरचं त्याचं जीवन या साऱ्याचं चिंतनात्मक विवेचन करणारं हे पुस्तक आहे.

-----------------------------------------------------------------------------------------

समर्थांचे समर्थ दर्शन घडवणारी ग्रंथसंपदा

राष्ट्रीय संत श्री समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील महत्त्वाचे संत. एक वेगळीच सामाजिक दृष्टी असलेले समर्थ रामदास महाराष्ट्राच्या तनामनात रुजलेले आहेत. प्रपंच नेटका केल्याने परमार्थ साधता येतो असा उपदेश करणारे रामदास स्वामी प्रत्येक मराठी मनात स्थिरावलेले आहेत. कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेच्या ग्रंथदालनात श्री समर्थांवर आणि समर्थांच्या साहित्यकृतींवरील महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा आहे. अभ्यासक, साधक, विद्यार्थी, वाचक अशा सर्वांना अभिरुचिसंपन्न करणाऱ्या या ग्रंथसंपदेचा परिचय करून देत आहोत.

ग्रंथराज दासबोध

Granthraj Dasbodh

रामदासस्वामींचे चरित्र, कार्य आणि ग्रंथसंपदा तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं अखंड कार्य करणाऱ्या सुनील चिंचोलकर यांनी विवरण केलेला ‘ग्रंथराज दासबोध’ हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून अत्यंत उपयुक्त आणि मागदर्शक आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

श्री समर्थ चरित्र

Shree Samarth Charitra

समर्थांचे अलौकिकत्व डोळस पद्धतीने सांगणारे आळतेकर लिखित ‘श्रीसमर्थ चरित्र’ अतिशय अभ्यसनीय आहे. समर्थांच्या कार्याची त्यांनी सखोल चिकित्सा केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

समर्थ दर्शन

Samarth Darshan

१९८२ मधे श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या महानिर्वाणास ३०० वर्षे पूर्ण झाली होती त्यानिमित्ताने रामदासस्वामींवरील लेखांचा हा चिकित्सक ग्रंथ निर्माण केला गेला. मुद्‌गल, कावळे आणि अनिरुद्ध कुलकर्णी या तीन लेखकांनी या ग्रंथाचे संपादन केले. या ग्रंथाला समर्थभक्त के. वि. बेलसरे यांची प्रस्तावना आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

राजगुरु समर्थ रामदास

Rajguru

प्रस्तुत ग्रंथात समर्थवाङ्मयाचा व त्यातील विचारांचा संपूर्ण परिचय करून दिला आहे. अभ्यासक, विद्यार्थी आणि संतवाङ्मयाचे वाचक अशा सर्वांना प्रस्तुत ग्रंथ उपयुक्त आणि मार्गदर्शन करणारा आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

सामर्थ्ययोगी रामदास

Samarthyayogi Ramdas

समर्थवाङ्मय हे सर्वाथाने कायमच समाजोपयोगी असणारे असे वाङ्मय आहे. काळानुसार समर्थवाङ्मयाची उपयुक्तता तर जाणवतेच पण उपयुक्तता वाढतेच आहे. सामर्थ्ययोग किंवा समर्थयोग ही रामदासांची विशाल मूलभूत व सारभूत संकल्पना प्रभाकर पुजारी यांना नेमकी निवडता आली, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

श्री रामदासस्वामींचे प्रपंचविज्ञान

Prapanchavidnyan

प्रपंचविज्ञान यातील प्रपंच या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. यादृष्टीने प्रपंचात अंतर्भूत होणारे जे राजकारण आहे त्याचा विचार प्रस्तुत ग्रंथात स्वामींच्या वाङ्मयाच्या आधारे केलेला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

मनुष्यबळ व्यवस्थापन व दासबोध

Manushyabal

१७ व्या शतकात संपूर्ण भारतात ११०० मठांच्या व्यवस्थापनाच्या आधारे समाजप्रबोधनाचे कार्य समर्थ रामदासस्वामी यांनी केले. आजही ते विचार व्यवस्थापन शास्त्राचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक अशा सर्वांना मार्गदर्शक आहेत याबाबतचे चिंतन प्रस्तुत ग्रंथात केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

मनाचे श्र्लोक

Manache Shlok

मनाचे श्र्लोक ही स्वामी रामदासांकडून साधकांना लाभलेली अमोल ठेव. त्यात स्वामींच्या जीवनातील अनुभवामृत जसे आहे, त्याप्रमाणे सर्वोच्च वैदिक तत्त्वज्ञान; ही त्यातील महान्‌ बैठक होय. एक-एक श्लोक जसा राम-उपासनेचे वर्णन करतो त्याप्रमाणे साधकाचे बोट धरून तो त्याला विश्वव्यापी रामाचे दर्शन घडवितो. यातील आणखी विशेष म्हणजे स्वामींच्या चरित्राचे दर्शनही त्यात घडते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र धर्म आणि समर्थ

Maharashtra Dharma

महाराष्ट्र धर्म म्हणजे काय याचे विवेचन करून सामर्थ्यांनी हा धर्म कसा वाढीस लावला याचे सुयोग्य विश्र्लेषण करणारे हे पुस्तक आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

आनंदवनभुवन

Anandvanbhuvan

आनंदवनभुवन हे जे स्वामींचे अलौकिक काव्य, ते स्वामींचे भविष्यदर्शन होय. त्यात त्यांनी केवळ एकच भविष्य कथन केलेले नाही. भावी काळातील कित्येक टप्पे दाखवले आहेत. अर्थात्‌ स्वामींना बालपणापासून केवळ जनचिंता, विश्र्वचिंता व धर्मचिंताच होती. आनंदवनभुवनातील प्रतिपादनात त्यांनी ‘रामराज्या’चा अर्थात ‘सत्यधर्मा’चा जो भावी काळ व त्यानंतर बदलत जाणारे जे चित्र त्याचे दर्शन विस्ताराने मांडले आहे; हे नि:संशय. ‘रामराज्य’, ‘महाराष्ट्रधर्म’ आणि आनंदवनभुवनात जी एक समान गुंफण आणि तत्त्वज्ञान आले आहे, त्याचा आणि त्यांच्या चरित्राचा धावता आढावा घेणारे दर्शन प्रस्तुतच्या पुस्तकात आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

रामदासांच्या निसर्गरम्य घळी

Nisargaramya Ghali

समर्थांमुळे ज्या ज्या घळी पावन झाल्या त्या सर्व घळींची भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती देणारे हे छोटेखानी पुस्तक आहे.