कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या ग्रंथदालनातील वैभवशाली ग्रंथपरंपरेतील ‘मराठ्यांचा इतिहास’ हा एक संग्राह्य ग्रंथ. या ग्रंथाचे तीन खंड एकत्रित नव्या आकर्षक रूपात कॉन्टिनेन्टलने वाचक, अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
___________________________________________________
विद्याधर पुंडलिक यांचे पहिले नाटक. महाभारतातील द्रौपदी या व्यक्तिरेखेतून जाणवलेल्या काही गोष्टींचं मुक्त चिंतन पुंडलिकांनी लेखकाचे कल्पना स्वातंत्र्य घेऊन केलेले आहे. विजया मेहतांसारख्या मेहनती दिग्दर्शिकेने रंगायतनतर्फे या नाटकाचा प्रथम प्रयोग केला होता.
___________________________________________________
व्यंकटेश माडगूळकरांचे हे सामाजिक नाटक. हिंदू मुलीनं मुसलमान मुलाशी लग्न ठरवलं तेव्हाची सामाजिक घडामोडी, माणसाच्या मनाची अवस्था, पोटची पोर म्हणून नाकारणं या साऱ्याचं संयतशील आणि विचारप्रवृत्त करणारं चित्रण माडगूळकरांच्या या नाटकातून दिसतं.
___________________________________________________
व्यंकटेश माडगूळकर यांचे हे ग्रामीण जीवनाविषयीचं चिंतन व्यक्त करणारं नाटक आहे. भौतिक जीवनाचा विकास होत गेला तसं माणूसपण कमी कमी होत चाललं असल्याचं चिंतन माडगूळकरांनी या नाटकात व्यक्त केलं आहे.
___________________________________________________
ना. वि. बापट यांची ही कादंबरी कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांनी संक्षिप्त स्वरूपात वाचकांसमोर आणली. पानिपतच्या मोहिमेवरची ही उत्कंठावर्धक कादंबरी.
___________________________________________________
प्रस्तुतच्या ‘पाच कथाकार’ मध्ये दोन महायुद्धांच्या दरम्यान निर्माण झालेल्या कथेचा आलेख वाचकांसमोर कथांद्वारा ठेवण्याचा प्रयत्न आहे. वाचकांना तो फार आवडलाही आहे. या संकलनाच्या, प्रदीर्घ प्रस्तावनेत वि. स. खांडेकरांनी कथा ह्या साहित्यप्रकाराची मराठी कथेच्या संदर्भात सखोल चिकित्सा केली आहे, त्यामुळे हे पुस्तक रसिकांप्रमाणेच अभ्यासकांनाही भावले आहे.
___________________________________________________
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे समग्र दर्शन घडवणारा इतिहास या ग्रंथात इ. स. पू. २३५ ते इ. स. १९४७ या सुमारे बावीसशे वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विवेचन केले आहे.
महाराष्ट्र संस्कृतीच्या इतिहासाचे सातवाहन ते यादवकाळ, बहामनीकाळ, मराठा काळ व ब्रिटिश काळ असे चार विभाग पडतात. यातील पहिला काळ स्वातंत्र्याचा, पराक्रमाचा, विद्या, व्यापार, कला यांच्या उत्कर्षाचा काळ होता. दुसरा बहामनी काळ हा पूर्ण पारतंत्र्याचा काळ होता. स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रयत्न देखील कुणी केलेला दिसत नाही. यानंतरचा काळ म्हणजे मराठा काळ. या काळाचे मोठे वैभव म्हणजे मोगल सत्तेचे निर्दाळण होय. हिंदुत्वाचे रक्षण हे या काळातील मराठ्यांचे अलौकिक कर्तृत्व म्हणता येईल. यानंतरचा ब्रिटिशांचा काळ हा पारतंत्र्याचा असूनही वैभवशाली ठरला याचे कारण प्रारंभापासून महाराष्ट्राने स्वातंत्र्याची अपेक्षा धरून पाश्र्चात्य विद्यांचा अभ्यास करून स्वातंत्र्यलढ्याची तयारी चालवली होती. स्वातंत्र्याकांक्षा व पाश्र्चात्त्य विद्या यांमुळे तत्कालीन जागृती होऊ लागली आणि त्यांची अस्मिता जागृत झाली. त्यातूनच मानवी कर्तृत्व उदयास आले आणि स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्याची प्रेरणा भारताला मिळाली.
असा रोचक आणि माहितीपूर्ण इतिहासग्रंथ पु. ग. सहस्रबुद्धे लिहून आजच्या काळातील तरुण पिढीवर एकप्रकारे संस्कारच केले आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयाने वाचलाच पाहिजे असा हा ग्रंथ आहे.
___________________________________________________
ह. भ. प. रावसाहेब स. के. नेऊरगावकर यांनी तुकाराम महाराज यांच्या सार्थ गाथेतील अभंगांचे विवरण त्या त्या अभंगांच्या खाली दिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकाला तसंच साधकांनाही हा गाथा मार्गदर्शक ठरतो. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या संग्रही हा गाथा असणं ही अभिमानाची गोष्ट आहे.
___________________________________________________
महाराष्ट्राचे थोर तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांनी ‘गीतारहस्यानंतरचा थोर ग्रंथ’ म्हणून जावडेकरांच्या ‘आधुनिक भारत’ या ग्रंथाचा गौरव केला होता. प्रत्येक संशोधक, अभ्यासकाला मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ प्रकाशनाने नव्या देखण्या स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे.
___________________________________________________
मराठी माती आणि किनारा हे कुसुमाग्रजांचे कवितासंग्रह नव्या आकर्षक स्वरूपात रसिक वाचकांसाठी प्रकाशनाने उपलब्ध केले आहेत.
___________________________________________________
सौंदर्यवादी कवी माधव ज्यूलियन् यांच्या निवडक कवितांचे कवी गिरिश यांनी संपादन केलेले उत्कृष्ट पुस्तक ‘स्वप्नलहरी’
___________________________________________________
वि. वा. शिरवाडकर लिखित ‘जान्हवी’ कादंबरी पुन्हा वाचकांसाठी उपलब्ध
___________________________________________________
वि. स. खांडेकर लिखित कथासंग्रह ‘नवा प्रात:काल’
___________________________________________________
श्री. म. माटे यांनी सांगितलेल्या अंतरंगातल्या गोष्टी ‘उपेक्षितांचे अंतरंग’
___________________________________________________
(किंमत १२५/-) (पृष्ठे - १४६)
चिं. वि. जोशी लिखित दहा विनोदी नाटिका आणि एकांकिका
___________________________________________________
(किंमत १२५/-) (पृष्ठे - १२८)
संत एकनाथांची चरित-कथा
___________________________________________________
(किंमत ३००/-) (पृष्ठे - ३३२)
संत एकनाथांच्या वाङ्मयीन, धार्मिक आणि सामाजिक कार्याचे तौलनिक व यथार्थ मूल्यमापन या प्रबंधात आढळेल.