कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे लेखक श्री. श्रीनिवास हवालदार यांच्या ग्रेसच्या कविता  'धुक्यातून प्रकाशाकडे' यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे साहित्य अकादमीचा कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार मिळाला.

---------------------------------------------------------------------------------

१७६१ च्या पानिपतच्या इतिहासाशी निगडीत तीन इतिहासप्रेमी - संशोधक व्यक्तींचा ‘ब्राह्मण सेवा जागृती संघाचे’ श्री. काणे यांच्या वतीने शुक्रवार दि. २४.०१.२०२० रोजी केसरीवाडा, पुणे येथे संपन्न झालेला गौरव-सन्मान.
सन्माननीय अतिथी
१) मा. श्री. पांडुरंगशास्त्री बलकवडे - ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ
२) मा. श्री. आशुतोष गोवारीकर - ‘पानिपत’ चित्रपटाचे निर्माते - दिग्दर्शक
३) मा. श्री. कौस्तुभ कस्तुरे - ‘प्रतिशोध पानिपतचा’ ग्रंथाचे लेखक

कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
१) मा. श्री. मुरलीधर मोहोळ - महापौर
२) मा. श्री. धीरज घाटे - पुणे महापालिका सभागृह नेते
३) मा. श्री. रोहित टिळक - केसरी ट्रस्ट चेअरमन
४) मा. श्री. योगेश्र्वर गंधे - सरदार अंताजी गंधे यांचे वंशज
५) मा. अमृता कुलकर्णी - प्रकाशक, प्रतिशोध पानिपतचा

---------------------------------------------------------------------------------

कॉंटिनेंटल प्रकाशनच्या 'अर्थजिज्ञासा' पुस्तकाचे लेखक डॉ. वि. म. गोविलकर यांची एबीपी माझा वरील मुलाखत

---------------------------------------------------------------------------------

शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे डॉ. अंजली सोमण यांना त्यांच्या 'कादंबरी' या वाङ्मय प्रकारातील योगदानाबद्दल डॉ. नागनाथ कोत्तापल्ले  यांच्या हस्ते  कै. मालतीबाई दांडेकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

---------------------------------------------------------------------------------

प्रकाश किरण प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय ग्रंथ साहित्य पुरस्कार यावर्षी रमाकांत देशपांडे लिखित न्यायनिष्ठ रामशास्री प्रभुणे या कादंबरीला मिळाला.

---------------------------------------------------------------------------------

MGA

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. गीतांजली घाटे यांच्या 'आक्षिप्त मराठी साहित्य' या ग्रंथाला मिळालेली पारितोषिके

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाप नावाची माय - दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न

Baap Navachi Maay

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

सांगलीच्या नगर वाचनालयात ग्रंथ-प्रदान 

दि.९नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा श्री. अरुणाताई ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीच्या नगर वाचनालयात ग्रंथ-प्रदान करण्याचा समारंभ संपन्न झाला.  या कार्यक्रमास  डाॅ. अरूणाताई ढेरे, म.सा.प. चे अध्यक्ष प्रा मिलींद जोशी, उपाध्यक्षा डाॅ. तारा भवाळकर,  रोटरी क्लब आॅफ सांगलीचे अजय शहा यांचीही उपस्थिती होती. सांगली जिल्हा  नगरवाचनालयातर्फे अध्यक्ष श्री. पटवर्धन यांनी काही प्रातिनिधिक पुस्तकांचा स्वीकार केला. रोटरी क्लब आॅफ पुणे युनिव्हर्सिटीतर्फे प्रेसिडेंट सुजाता कुलकर्णी, सेक्रेटरी प्रियांका कर्णिक, माजी अध्यक्ष महेश भागवत, खजिनदार डाॅ. रवी कुलकर्णी, रो. रश्मी भागवत इ. पदाधिकारी उपस्थित होते. युनिव्हर्सिटी क्लब तर्फे २ लाख रुपयांची पुस्तके दिली. यामध्ये काँटिनेंटल प्रकाशनाचा वाटाही मोठा आहे. तसेच क्लबचे  विनय राव, महेश भागवत व प्रेसि. सुजाता यांनीही वैयक्तिक पातळीवर पुस्तके प्रदान केली.... काॅन्टिनेन्टल परिवारातर्फे श्री. ऋतुपर्ण कुलकर्णी  यांनी या खेरीज इतर काही निवडक नवीन क्लासिक्सही भेट म्हणून प्रदान केली..

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

तत्त्वशून्य व्यवहारास सांस्कृतिक मान्यता मिळाल्यास संवेदनशील मनाची घुसमट

- प्रा. मिलिंद जोशी

पुणे- निती-अनितीच्या गोष्टी सोयीने स्विकारण्यास प्रारंभ झाल्यास तत्त्वशून्य व्यवहाराला प्रारंभ होतो. अशा तत्त्वशून्य व्यवहारास सांस्कृतीक मान्यता मिळाल्यास संवेदनशील व्यक्तींच्या मनाची घुसमट होते, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केले. 

कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रसिद्ध लेखिका प्रियांका कर्णिक यांनी लिहिलेल्या 'मोक्ष' या कादंबरीचे प्रकाशन प्रा. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पु. ना. गाडगीळ सराफचे संचालक अभय गाडगीळ, 
कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 
प्रा. मिलींद जोशी म्हणाले की, काळाच्या कसोटीवर अनेक प्रश्न उपस्थित होतच असतात. आज सभोवताली दिसणा-या प्रश्नांचे स्वरुप बदलले आहे.  पूर्वी विधवा पुर्नविवाह, स्त्रीयांचे शिक्षण, बहुजनांच्या शिक्षणाचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांची शृखंला होती. पंरतू त्या त्या काळी नेतृत्व पुढे आले आणि त्यांनी या प्रश्नांची समीक्षा करुन त्यातून योग्य मार्ग काढले. त्या सामाजिक जाणिवा वृद्धिंगत करण्याचे धडे देणारे नेतृत्व आज गेले कुठे असा प्रश्न पडतो. सामाजिक उत्तरदायित्व, सामाजिक बांधिलकी हद्दपार होते आहे की काय अशी शंका येते. या समाजमूल्यांना तीलांजली देऊन समाज व्यापार केंद्रीत समाजरचनेकडे वाटचाल करीत आहे, हे खेदाने नमूद करावसे वाटते. महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या सात सामाजिक पापांना आता सामाजिक प्रतिष्ठता लाभत चालली आहे. या स्थित्यंतराची पडछाया राजकारणात दिसत आहे. समाजातील आदर्शांना तडा गेला आहे. समाज भांबवलेल्या अवस्थेत आहे. बाहेरचा आवाज वाढल्याने आपल्याला आपला आतला आवाज एेकु येऊ नाहीसा झाला आहे.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. लेखिका प्रियांका कर्णिक यांनी पुस्तक लिहण्यामागची भूमिका विषद केली. पु. ना. गाडगीळ सराफचे संचालक अभय गाडगीळ यांनीही यावेळी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. अभय जोशी यांनी सूत्रसंचालन यांनी केले.  
Moksha
कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रसिद्ध लेखिका प्रियांका कर्णिक यांनी लिहिलेल्या 'मोक्ष' या कादंबरीचे प्रकाशन करताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी. यावेळी (डाविकडून) कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी, पु. ना. गाडगीळ सराफचे संचालक अभय गाडगीळ, प्रा. जोशी आणि  लेखिका प्रियांका कर्णिक.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

Homeopathy

प्रसिद्ध लेखक श्री शिवराज गोर्ले लिखित कॉंटिनेंटल प्रकाशन तर्फे प्रकाशित "होय होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते" हे पुस्तक श्री बाबा रामदेव ह्यांनी SEARCH क्लिनिक ला भेट दिली तेव्हा देताना डॉ शैलेश देशपांडे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

Tahan

Tahan

Tahan

Tahan

Tahan

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

भविष्य आरोग्याचे भाग दुसरा

- मोहिनी वाडदेकर

Bhavishya Arogyache

सोमवार दिनांक ९ सप्टेंबर २०१९ रोजी कॉन्टिनेन्टल प्रकाशित मोहिनी वाडदेकर लिखित ‘भविष्य आरोग्याचे भाग २’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. धोंडूमामा साठे होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. प्रदीप सेठिया यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक डॉ. वंदना बोकील कुलकर्णी होत्या.

भविष्य आरोग्याचे या पुस्तकाचा पहिला भाग देखील कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. अत्यंत उपयुक्त असे हे दोन भाग प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे झाले आहेत. पूर्वीच्या काळी ‘आजीबाईचा बटवा’ प्रत्येक घरात असे ते काम भविष्य आरोग्याचे भाग १ व भाग २ ही पुस्तके करतात.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

शस्त्रवेध ‘मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व’

- गिरिजा दुधाट 

shastravedh

कॉन्टिनेन्टल प्रकाशित आणि गिरिजा दुधाट लिखित शस्त्रवेध ‘मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. तेजस गर्गे (संचालक, महाराष्ट्र पुरातत्व मुंबई), श्री. अहमद अली (अभिरक्षक, निझाम संग्रहालय, हैदराबाद) आणि श्री गिरीशराव जाधव (ज्येष्ठ शस्त्राभ्यासक व संग्राहक जयसिंगपूर) यांच्या शुभहस्ते  रविवार दि. ४ ऑगस्ट २०१९ रोजी झाले.