चित्रपट सृष्टीतील कलाकारांभोवतीच्या गॉसिफ भोवतीच अडकून न राहता त्या कलाकारांनी मेहनतीने, जिद्दीने, कष्टाने अभिनय क्षेत्रात जी उंची गाठलेली असते त्याबाबत देखील गंभीरपणे लेखन, डॉक्युमेटेंशन होणे गरजेचे आहे, चित्रपट पत्रकारीता करणाऱ्या अभ्यासू पत्रकारांनी, अभ्यासकांनी याबाबत गांभिर्याने विचार करुन एकवेळ चित्रपटसृष्टी गाजवलेल्या दिग्गज कलाकारांबाबत अभ्यासपूर्ण लेखन करावे अशी अपेक्षा ज्येष्ठ सिनेअभ्यासक आणि लेखिका सुलभा तेरणीकर यांनी व्यक्त केली.
दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या जीवनप्रवासावर आधारित कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि प्रसन्न पेठे लिखीत
'प्रिन्स चार्मिंग' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध निवेदक आणि सवाई गंधर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आनंद देशमुख, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी, बुकगंगा डॉट कॉमचे प्रमुख सुप्रीय लिमये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुलभा तेरणीकर म्हणाल्या की, दस्तवेजाच्या बाबतीत पाशात्य देशांमध्ये जी सजकता आणि जागृतकता दिसून येते तेवढी भारतीय चित्रपटसृष्टीबाबत दिसून येत नाही. दिलीपकुमार, देवानंद आदी कलाकारांनी अजरामर करुन ठेवलेल्या भुमिकांबाबत असो किंवा व्यक्तिरेखांवर आधारीत असो कोणत्याना कोणत्या स्वरुपाता त्यांचे काम पुस्तकांच्या स्वरुपात येणे गरजेचे आहे, तरच आजच्या आणि येणाऱ्या पिढी समोर या दिग्गजांचे योगदान अधोरेखीत होईल.पृथ्वी थेअटरच्या माध्यमातून कपूर घराण्यात्यातून येणऱ्या कलाकारांनी अभिनयाची एक वेगळीच उंची गाठली होती. शशी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टी सोबतच थेटरवर देखील मनापासून प्रेम करत होते. त्यासोबतच त्यांनी पाशात्य देशांत देखील विविध चित्रपटांमध्ये काम करुन तेथे त्यांचा एक चाहतावर्ग निर्माण केला होता.
यावेळी बोलताना आनंद देशमुख म्हणाले की, शशी कपूर यांचा काळ हा मल्टीटास्कींग कास्ट आणि बॅल्क अॅण्ड व्हाईट कडून रंगीत चित्रपटांकडील वाटचालीच्या स्थित्यंतराचा काळ होतो. शशी कपूर यांच्या अदाकारीने आमची पिढी भारावलेली होती तरी देखील शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाकडे थोडे दुर्लक्षच झाले असे म्हणावे लागेल. हॉलीवूडच्या युर्निवर्सल थेटर मध्ये त्यांची पोस्टर्स लागलेली असायची पंरतू त्यांनी भारतात हव्या त्या प्रमाणात प्रसिद्धि मिळाली नाही.
लेखक प्रसन्न पठे यांनी देखील यावेळी शशी कपूर आणि त्यांनी त्यांच्या मनावर घातलेले गारूड मनोगताव्दारे व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी यांनी प्रकाशकीय भूमिका विशद केली. बुकगंगा डॉट कॉमचे प्रमुख सुप्रीय लिमये यांनी देखील हे पुस्तक ई-बुक आवृत्तीत काढण्यामागीत त्यांची भुमिका विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा रहाणे यांनी केले.