Swatantryasukte

स्वातंत्र्यसूक्ते

काळातील निवडक निबंधांचा संग्रह (शि. . परांजपे)

संपादक - अनंत अंबादास कुलकर्णी

प्रथमावृत्ती - १९५२

यानंतर १९५५, १९५९, १९६२, १९६४, १९७९ पर्यंत आवृत्ती काढल्या गेल्या.

कॉन्टिनेन्टलच्या इतिहासातील महत्त्वाचं पुस्तक. के. ना. वाटवे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. काळकर्ते शिवरामपंत परांजपे यांच्याकाळातील निवडक निबंधांचा हा प्रस्तुत संग्रह. स्वातंत्र्यप्राप्तीच्या उर्जेने केलेले हे लेखन, त्यातली भाषा, तत्कालीन इतिहास या साऱ्याचे एक भव्य रूपस्वातंत्र्य सूक्तेया पुस्तकातून दिसतं. अशी अत्यंत मोलाची, दर्जेदार पुस्तकनिर्मिती ८१ वर्षांपासून आजपावेतो चालत आलेली आहे. संपादन कॉन्टिनेन्टलचे संस्थापक कै. अनंत अंबादास कुलकर्णी यांनी केलेलं आहे. त्याकाळात अनंतरावांनी अशी अनेकानेक दर्जेदार, महत्त्वपूर्ण आणि आजच्या काळाच्या पटावर इतिहासाची माहितीपूर्ण ठरणारी अशी पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. अनंतरावांची वाङ्मयीन जाण आणि दृष्टी दोन्ही काळाच्या पुढची होती त्यामुळे विषय आणि पुस्तकांचं मोल जाणून त्यांनी ग्रंथनिर्मिती केलेली दिसते तेस्वातंत्र्यसूक्तसारख्या या पुरातन पुस्तकावरून दिसून येते.