-------------------------------------------------------

'मनस्विनी' मिळाली आणि एका बैठकीत वाचून काढली.काशीबाई च्या स्वभावाचे कंगोरे ठळकपणे समोर आले-त्यांनी पतीची पाठराखण तर केलीच पण,मस्तानीला बहिणी सारखी माया लावली-फक्त कादंबरी मधले एक वाक्य खटकले. वाक्य असे आहे 'दख्खनचा वाघ बाजीरावांच्या पिंजऱ्यात बरोबर अडकला ' वाघ तर बाजीराव होते -निजाम नाही. जर पुढची आवृत्ती आली-म्हणजे येणारच -तेव्हा वाक्य असे लिही -' स्वतःला दख्खन चा वाघ समजणाऱ्या निजाम बाजीरावांच्या पिंजऱ्यात बरोबर अडकला'-बाकी कादंबरी उत्तम-तुझी भाषा नादमय आहे-आपण प्रसंगात गुंतत जातो-पुढील लेखनासाठी तुला शुभेच्छा आणि आशीर्वाद.

बी. जी. याज्ञिक
सिकंदराबाद
अवघे 90 वयोमान

-------------------------------------------------------

ही गोष्ट आहे एका स्वामिनी, पतिव्रता, मनस्विनी, गृहलक्ष्मी, समाधानी.... कितीही कौतुकीत आभूषणांनी वर्णावी पण कमीच पडेल अश्या पेशवीण बाईंची, काशीबाईंची ... खरं म्हणावं तर काही कारणांनी दुर्लक्षिलेल्या गेलेल्या त्या प्रेमिकेची, जिने शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पतीवर रायांवर मनापासुन प्रेम केलं....

वादळवाटेवरून चालतांना अनेक प्रसंग असे आले की पेशवीण पद सांभाळताना तिची दमछाक झाली असेल, पण घेतलेली जबाबदारी तिने शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळली...
नवऱ्याच्या मागे पेशवाईचा कारभार, रयतेचं सुख, कर्तव्यदक्ष सून, पोटच्या गोळ्यांचे संगोपन ते अगदी मस्तानीच्या मागे तिच्या बाळाचे संगोपन... कुठेच कमी पडली नाही ती....
अश्या त्या रणांगणावर न लढता संसाराचा गाडा ओढणाऱ्या आणि अपराजित योध्याच्या मागे खंबीर पणे उभ्या ठाकलेल्या रणरागिणीची गोष्ट....

Mam Archana Deo तुमच्या मुळे आज प्रकाशात आलेल्या काशीबाईंची जीवनकहाणी सगळ्यांना कळतेय...
जशी maths आवड तुम्ही आम्हा students च्या आयुष्यात निर्माण केली, तसाच आता तुम्ही तुमच्या लिखाणातून वाचनाची गोडी निर्माण करताय...
खुप खुप धन्यवाद...

मनस्वी सायगावकर,
पुणे

-------------------------------------------------------

अर्चना देव यांची , श्रीमंत काशीबाई पेशवे यांच्यावर आधारित असलेली "मनस्विनी " ही कादंबरी वाचली आणि अक्षरशः लेखिकेच्या ओघवत्या लेखणीवर आणि काशीबाईंच्या कर्तृत्वावर मी मनस्वी अवाक झाले ....
या कादंबरीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यातील नायिका काशीबाई यांच्या अवतीभोवती ही कादंबरी पिंगा घालते
काशीबाईंच्या स्वभावाचे कितीतरी धागे लेखिकेने सहज विणले पण एक धागा असा काही विणला की वाचकांचे चित्त त्या धाग्यावर स्थिराववते...
स्वतः काशीबाई म्हणतात ."या पैठणीच्या एक धागा असा आहे आमच्या अबोल दुःखाचा , मूक वेदनेचा , जो या पैठणीत बेमालूमपणे मिसळला आहे. मात्र या अबोल धाग्याने पैठणीची वीण घट्ट धरून ठेवली .... " लेखिकेने पण शब्दांची वीण अशीच घट्ट धरून ठेवली ! नवीन प्रकरणाच्या आरंभी त्यांनी नायिकेच्या मनात चाललेली छटा वैविध्यपूर्ण नैसर्गिक दाखले देऊन वाचकांचे चित्तरंजन केले.
अर्चना ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

जयश्री कविमंडन
मेहकर

-------------------------------------------------------

छान विस्तृत माहिती मिळाली.आपल्या लेखणी तून अशीच सत्य लेखन परखडपणे उतरो व वाचावयास मिळो.याकरीता शुभेच्छा. माझ्या सारख्या बौद्धिक खाद्यासाठी आसुसलेल्या वाचकांना तेवढीच मेजवानी.

लता किडे
मूर्तिजापूर

-------------------------------------------------------

लेखिका सौ अर्चनाताई देव यांची मी वाचक मैत्रीण

त्यांनी लिहिलेली श्रीमंत काशीबाई पेशवे यांच्या जीवनावरील चरित्र कहाणी वाचनात आली आणि त्यातील व्यक्तिरेखा वाचून मी भारावून गेली ....

मनात विचार आला ....काल्पनिक कथा लिहिणे त्या मानाने सोपे, अर्चनाताईंनी या मागे केवढी वाचनशक्ती पणाला लावली असेल
वेगवेगळे पुस्तके वाचून त्यातील हवे ते संदर्भ घेऊन ..त्या ऐतिहासिक ठिकाणी भेटी देऊन ...व्यक्तिरेखा रेखाटणे सोपे नाहीच ,त्याबाबतीत ताईंना साष्टांग दंडवत

खूप अभ्यास पूर्वक आणि ओघवते लिखाण आहे , कथानक आपल्याला वाचन करताना खिळवून ठेवते. माझ्या समोर बाजीराव म्हटले की मस्तानी हेच गणित.. वाचन, सिरीयल यामध्ये हेच दाखवत होते. या कादंबरीत मला श्रीमंत बाजीराव पेशवे चे अनेक गुण अभ्यासता आले एक अशी व्यक्तीरेखा जी वाचताना त्यांच्या साठी नकळत अश्रू ओघळले. ताईंनी काशीबाई अत्यंत समर्थ पणे उभारल्या आहे... पेशव्याच्या जीवनात मस्तानी आल्यावर काशीबाई आणि श्रींमंतांचे संबध संपुष्टात आले असेच वाचनात होते ...पण यामध्ये एक करारी , बुध्दिमान स्त्री कशी असते ते वाचायला मिळाले.

मनस्विनी हे नाव देखील खूप विचार करून ठवलेले दिसते ...मला फार आवडले. सर्वांनी वाचावी अशी कादंबरी

अर्चनाताईची मी खूप आभारी आहे त्यानी ही कादंबरी माझ्या पर्यत पोहचविण्याची व्यवस्था केली ... अर्चना ताईंना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा  तुमची लेखणी अशीच लिहिती राहो आणि आम्हा वाचक प्रेमींना असेच चांगले वाचायला मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

एक वाचक मैत्रीण
सौ मंजिरी मोहन राजदेरकर
मेहकर, बुलढाणा

-------------------------------------------------------

वैदर्भीय लेखिका अर्चना देव यांची मनस्विनी कादंबरी मनस्वी भावेल अशीच सिध्दहस्त उमटली आहे . इतिहासातील तुटक धाग्यांना सत्याचा आधार देत देत व्यक्तिमत्त्वांची सत्याधिष्टित उभारणी करणे हेच कादंबरीकाराचे महत कौशल्य असते आणि ते अर्चना देव यांना मनस्वी साध्य झाले आहे . प्रथम भावते ते पेशवेकालीन वातावरण ! शब्दाशब्दा तून पैठणीच्या जरीच्या धाग्यासारखे पेशवेकालीन अधिराज्य उमटले आहे . एकही इंग्रजी , उर्दू शब्द न वापरता त्या सर्व भावगंधी रंगछटा झंकृत झाल्या आहेत हे देव यांचेच शब्द वापरून सांगतो . मराठी तिथींना महत्व दिलेले आहे . पोषाख, वाडे, भोजन पंगती , महाल , झुंबरे , पेशवाई वस्त्रे , या वातावरणात आपण रंगून जातो . काशीबाई व बाजीराव यांचा प्रेमभाव सांगताना " मनाच्या निळ्याभोर अंबरात शुभ्र चांदण्या तेजाळल्या " अशी सुंदर शब्दांची उधळण होते. अथ ते इति कोठेही कादंबरीचा बाज व डौल ढिला पडलेला नाही . इतिहासाची प्रतारणा कोठेही नाही . कोणत्याही पात्रावर अन्याय नाही की अधिक झुकते माप नाही . मस्तानीला

" यवनी " सारखा योग्य शब्द वापरला तर सती शब्दाला सुध्दा
" सहगमन " शब्द वापरून त्या काळच्या स्त्री मनोभूमिकेत जणू लेखिका स्वतः जगली . शाहू महाराजांच्या भूमिकेला इतिहासात न्याय मिळाला की त्यांनी योग्य व्यक्तींना जोखले . निझाम पराभव , दिल्ली स्वारी , चिमाजी अप्पा चे कर्तुत्व हा सारा इतिहास नवीन पिढीला येथे ओघाओघाने कळतो . पेशवाईतील नातेसंबंध सखोल समजतात . बाजीराव पेशवे गेले तेंव्हा " क्षणभर नर्मदेचे पाणीही वाहायचे थांबले " अश्या काव्यात्मक ओळी येतात . मुख्य गाभा आहे तो म्हणजे मस्तानी , काशीबाई व बाजीराव यांचे संबंध ! येथे ऐतिहासिक पुराव्यांचा जरी अभाव असला तरी एका स्त्रीने स्त्रियांची रेखाटलेली मनोभूमिका आहे हे महत्त्वाचे . स्त्री मुक्तीच्या आधुनिक काळातील स्त्रियांना व मुलींना तसे पाहता या न पटणाऱ्या गोष्टी असल्या तरी कोठेही विसंगत वाटणार नाही व अविश्वसनीय रेखाटन वाटू नये हे या कादंबरीने निश्चितच साध्य केले आहे !
आपण भावविभोर होतो ते शेवटी काशीबाईंनी केलेल्या सिंहावलोकनात! मला तर हे
सिंहावलोकन म्हणजे कादंबरीचा एकंदर आत्मा वाटतो . " क्षुल्लक " कटकटीने " इकडचे " लक्ष विचलित होवू नये म्हणून आम्ही मनाला मुरड घातली , या एकाच वाक्यात काशीबाई हे पात्र स्त्रीदृष्ट्या एका वेगळ्या उंचीवर पोहोचते . म्हणूनच काशीबाई "सोशिकतेची आदर्शमूर्ती"
ठरतात पण मस्तानी त्याचवेळी उत्तान ठरत नाही . हा समतोल लेखिकेने टोकाचा साधला आहे . अशी स्त्री भूमिका आज अनेकांना गुलामी वाटेल परंतु तीच गुलामी झुगारून झालेली आजची सामाजिक उत्तान अवस्था बघतांना त्याच सोशिकतेने समाजाला वेगळी उंची दिली होती हे विसरून चालणार नाही . आधुनिक पिढीला इतिहास सांगताना पेशवाईतील अनेक पात्रांना दुर्लक्षित केले गेले किंवा वेगळेच दाखवल्या गेले . ते महापुरुष , तो काळ , केवळ काशीबाई नव्हे तर मस्तानीला सुध्दा न्याय मिळाला आहे . नानासाहेब , राधाबाई सुध्दा व्हीलन न वाटता त्यांच्या ठिकाणी योग्य वाटतात . आधुनिक पिढीने हे सर्व जरूर वाचावे . कॉन्टिनेन्टल ने आकर्षक मुखपृष्ठ घेतले . त्यांच्या दर्जानुसार कादंबरी निश्चितच अर्चना देव यांनी दिली आहे . अतिशय " मनस्वी " अशी " मनस्विनी " ....आकर्षक ...वाचनीय !

रघुनंदन देशपांडे, बुलडाणा, विदर्भ

-------------------------------------------------------



"रे सावळ्या घना" वरील अभिप्राय!

एका असंस्कृत ( संस्कृत भाषेचा गंध नसल्यामुळे )माझ्या सारख्या व्यक्तिला संस्कृत साहित्यातील एका उच्च साहित्यिक कलाकृतींचा आनंद “रे सावळ्या घना” ने आणून दिला,त्याबद्दल मन:पूर्वक आभार!
अत्यंत ओघवती भाषा ,सौंदर्यपुर्ण वर्णन व त्यासाठी घेतलेली मेहनत पाना-पाना गणिक जाणवत राहिल्याशिवाय रहावत नाही.कालीदास व मेघदूत यांचे महत्व ,कौतुक ही आत्तापर्यंत माझ्यासाठी केवळ ऐकिव गोष्टच होती.पण त्यात झालेला तुझा प्रत्यक्
ष अनुभवता आला.आणी हा अनुभव आषाढातील मेघवृष्टीनी व साहित्यीक चिंब होताना खूपच छान वाटले.
पुनश्च अभिनंदन व धन्यवाद !

अरुण घोले

-------------------------------------------------------

kurtadlelya

डॉ, अंजली जोशी यांनी लिहिलेलं  'जो भजे सूर को सदा ' हे पुस्तक नुकतंच वाचून संपलं, ते वाचल्यावर मनात उमटलेले विचार कळवण्यासाठी हा लेखनप्रपंच.....

आजच्या सांगितीक वातावरणात अशा पुस्तकाची खरोखरच गरज होती. बालगायकांना मिळणारी वारेमाप प्रसिद्धी पाहून अनेक मुलं, त्याहीपेक्षा त्यांचे पालक या क्षेत्राकडे वळतात. मुळात शास्त्रीय संगीत हा गम्भीर विषय आहे, याचे भानही या मंडळीना नसते. ते गांभीर्य समजावून सांगायची गरज होती. हे केवळ मागे होऊन गेलेल्या महान गायकांच्या कथा सांगून जमले नसते.

असा गायनप्रिय समूह हेरून आज प्रसिद्धी पावलेल्या गायकांची उदाहरणे देऊन हा विषय पटवून सांगण्याचं काम हे पुस्तक करते. यासाठी अंजलीने केलेली तिन्ही गायकांची निवड योग्य आहे. त्यांच्या संगीत साधनेविषयी लिहिताना  लेखिका आपल्या उद्दिष्टापासून तसूभरही हलत नाही. रंजक असूनही कुठेही विषयाचं गांभीर्य ढळत नाही.

हा तोल सांभाळत लिहिलेल्या या पुस्तकासाठी डॉ. अंजली जोशी अभिनंदनास पात्र आहेत.

- उमा वि. कुलकर्णी

-------------------------------------

jo bhaje sur ko sada

-------------------------------------


संगीताची ओढ निर्माण करणारे पुस्तक
जो भजे सूर को सदा

अंजली जोशी लिखित व कॉन्टिनेन्टल प्रकाशित पुस्तक ‘जो भजे सूर को सदा’ हे संगीताची आवड असणाऱ्यांसाठी आणि संगीताविषयी विशेषत: शास्त्रीय संगीताची ओढ निर्माण करणारे पुस्तक आहे. या पुस्तकाचा गाभा म्हणजे पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. भीमसेन जोशी तसेच पं. वसंतराव देशपांडे या तीनही दिग्गजांचा संगीत वारसा जपणारे शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे यांचा सांगीतिक प्रवास होय. हा प्रवास वाचत असताना वाचकाला खूप प्रेरणा आणि शिकवण देऊन जातो. या गायकांच्या सांगीतिक वाटचालीतून शास्त्रीय संगीताविषयी आणि ते शिकण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव हे पुस्तक वाचकाला करून देते.

ज्याप्रमाणे प्रत्येक गायकाच्या मनात सुरांप्रती पूज्यभाव असतो तोच भाव या तीनही (शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे) गायकांच्या गायनातून दिसून येतो आणि म्हणून या पुस्तकाला दिलेले शीर्षक ‘जो भजे सूर को सदा’ समर्पक वाटते. शौनक अभिषेकी, आनंद भाटे आणि राहुल देशपांडे यांच्यावरील हे पुस्तक म्हणजे एक प्रकारची सुरेल मैफलच आहे हे वाचल्यावर जाणवते. गायकांच्याबाबत असलेले कुतूहल शमवणारे आणि विविध प्रश्नांचं समाधान करणारं हे पुस्तक आहे.

पुस्तक वाचत असताना अगदी सहज आणि सोपी भाषा तसेच सहज कळणाऱ्या वाक्यरचनेमुळे त्याचबरोबर पुस्तकात मांडलेल्या त्या त्या गायकांच्या अनुभवातील किस्से, फोटोंमुळे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवते . अभ्यासपूर्ण असे हे पुस्तक आहे. पुस्तक लेखनामागील हेतू साध्य करणारे हे पुस्तक आहे. आपल्या स्वप्नाप्रती किती गंभीर आणि सजग, निष्ठावान असायला हवं हे सांगणारे पुस्तक आहे. खरोखर या तीनही गायकांचा सांगीतिक प्रवास प्रेरणादायी आहे. या पुस्तकातील प्रत्येक गायकाचा प्रवास वाचकाला शिकवण देणारा, ऊर्जा देणारा आहे.

एखाद्या गायकाच्या यशस्वीतेमागे त्यांच्या गुरुची किती मेहनत असते आणि ते गुरु वडीलच असतील तर त्या गायकाचं आणि गुरुचं नातं कसं असावं याचं दर्शन घडवणारा शौनक अभिषेकी यांचा सांगीतिक जीवनप्रवास खूप प्रेरक आहे. गुरुनिष्ठा कशी असावी, हे सांगून जाणारा शौनक अभिषेकींचा जीवनप्रवास आहे. केवळ संगीत क्षेत्रातल्याच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातल्या विद्यार्थ्याने आपलं ध्येय निष्ठेनं, मेहनतीनं कसं गाठावं याचा उत्तम वस्तुपाठ शौनक अभिषेकी यांच्या या सांगीतिक प्रवासातून मिळतो. पंडित अभिषेकींसारखे वडील आणि गुरु शौनक यांना लाभले आणि खरा शिष्य म्हणून ते जरी गुरु देहानं त्यांच्या जवळ नसले तरीही गुरुआज्ञेनुसार चालत राहणं ही शिकवण देवून जातात.

कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना ज्ञानलालसेची आस आणि कास सोडू नये म्हणजे यश स्थिर राहातं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आनंद भाटे. यश मिळणं कष्टसाध्य आहे. परंतु यश पचवून स्थिर ठेवणं ही साधना आहे. ही शिकवण देणारे आनंद भाटे विद्यार्थ्यांसाठी उत्तम आदर्श ठरू शकतात हे त्यांची सांगीतिक प्रवास पाहिल्यावर, वाचल्यावर लक्षात येते. एखाद्या व्यक्तीने परिपूर्णतावाद आणि काटेकोरपणा स्वत:मध्ये कसा आणावा हे आनंद भाटे यांच्याकडून घेण्यासारखे आहे. पं. भीमसेनजींसारख्या संगीतातील अवलियाचे शिष्य असूनही त्यांच्या वागण्यात प्रामाणिकपणा, सच्चेपणा आणि संगीताच्याप्रती, गुरुंप्रती असणारी भक्ती व निष्ठा खूप काही देवून जाते. हे पुस्तकातील त्यांच्या अनुभवातील किश्श्यांमधून कळते.

एखाद्या गोष्टींबाबत असलेले तळमळ, कलाकार म्हणून असलेली भूक आणि सातत्याने नवीन काही करायची असलेली भूक आणि सातत्याने नवीन काही करायची असलेली जिद्द तसेच घरातील मोठ्या झालेल्या व्यक्तीचं नाव वापरून मोठं न होता स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:चं वेगळेपण निर्माण कसं करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल देशपांडे. आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांचा वाढलेला प्रेक्षकवर्ग, त्यांनी निर्माण केलेले स्वप्न, त्याच्यासाठी घेतलेली मेहनत तरुण पिढीला खूप प्रेरक आहे. हे त्यांच्या सांगीतिक वाटचालीबद्दल पुस्तकात वाचून लक्षात येते. सुरांचा ज्ञानाचा आजोबांकडून आलेला वारसा टिकवण्यासाठी घेतलेली अपार मेहनत, हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात दाखवलेलं सातत्य आणि उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’ या उक्तीचं तंतोतंत पालन कसं करावं हे राहुल देशपांडे यांचा जीवनप्रवास सांगून जातो. वैविध्यपूर्ण गुण स्वत:मध्ये कसे आत्मसात करावे हे त्यांच्या विविध क्षेत्रात केलेल्या कार्यातून दिसून येते.

-दीपक विजय पवार
विद्यार्थी, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Meghdoot

डॉ. विजयाताई यांचे  मनापासून अभिनंदन….

माझ्या साहित्यिक स्नेहपरिवारातील एक अगदी निकटच्या अभ्यासक प्रा. डॉ. विजया देव यांचं ‘मेघदूता’वरचं पुस्तक आज समारंभपूर्वक प्रकाशित होतं आहे; यामुळे होणारा आनंद माझ्या मनभर पसरलेला आहे. याला कारणही तसंच आहे. हे पुस्तक म्हणजे ‘मेघदूता’वर आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकांमध्ये पडलेली ‘‘निव्वळ भर’’ नसून जरा ‘हटके’च म्हणता येईल असं पुस्तक आहे.

‘मेघदूत’ हा कविकुलगुरु कालीदासांची एक अपूर्व रचना आहे. विप्रलभ शृंगाराचं असलं तरी हे ‘मधुर’च म्हणावं असं ‘सर्वांगसुंदर’ काव्य आहे. आजवर अनेकांना या काव्याची मोहिनी पडत आलेली आहे. अगदी भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामात आणि  तेल्यातांबोळ्यांच्या हितसंवर्धनात शंभर टक्के मन घातलेल्या लोकमान्य टिळकांचे देखील ‘मेघदूत’ हे अगदी आवडीचं काव्य होतं, असं ‘केसरी’च्या जुन्या फायली चाळीत असताना माझ्या वाचनात येऊन गेल्याचं मला या क्षणी आठवतं आहे. सी. डी. देशमुख आपल्याला माहिती आहेत ते इंग्लंडमध्ये आय. सी. एस. साठीच्या परीक्षेत एक अचाट, बिनतोड रेकॉर्ड तयार करून ठेवलेले संपूर्ण विश्र्वातले सर्वश्रेष्ठ बुद्धिमंत म्हणून. पण त्यांच्या मनालाही या काव्याने स्वत:कडे खेचून घेतलेलं होतं. ना. ग. गोरे, कुसुमाग्रज, वसंत बापट यांच्यासारख्या आकाशाच्या उंचीची प्रज्ञाप्रतिभा असणाऱ्या लेखकांनाही ‘मेघदूत’ आपापल्या पद्धतीने अनुवादित केल्याखेरीज राहावलं नव्हतं.

या काव्याचे मराठीत अनेक अनुवाद झाले. ‘मेघदूता’ची रसग्रहणं, समीक्षणं, परीक्षणं लिहिली गेली. इतकेच नव्हे तर मराठीमध्ये ‘मेघदूता’वर झालेल्या विविधरूपी लेखनाच्या शोधसमीक्षेचेही पीएच. डी. पदवी प्राप्तीसाठी लिहिलेले एक नव्हे तर दोन प्रबंध माझ्या पाहाण्यात आलेले आहेत.

मुख्य मुद्दा हा आहे की डॉ. विजयाताईंचं हे पुस्तक अशा समीक्षावाङ्‌मयापेक्षा खूप वेगळं, खूप निराळं आहे. म्हणूनच मी पुस्तक ‘हटके’ पुस्तक म्हणत आहे.

मला असं दिसतंय की ‘मेघदूत’ म्हणताच विजयाताईंच्या मनात निरनिराळे भावविचार, वेगवेगळे कल्पनाविचार तरळत असणार. हे भावविचार व कल्पनाविचार शब्दबद्ध करावेत असं त्यांना वाटलं असणार आणि त्यांनी अगदी तसंच केलं.

त्यांनी लेखन सुरु केलं आणि आपल्या लेखनाचा अंतिम दिनांक निश्र्चित केला. ठरल्याप्रमाणे त्या शुभदिनी, त्या उत्सवी दिवशी त्यांनी आपल्या लेखनाला पूर्णविराम दिला व त्यांची ‘लेखन संहिता’ तयार झाली. यापुढे सारं अनुकूलच घडत गेलं. पाहाना की विजयाताईंना अगदी ‘ॲण्टिक व्हॅल्यू’ असणारं हातानं काढलेलं चित्र ग्रंथाच्या कव्हरसाठी प्राप्त झालं.

विजयाताईंच्या हातून एक खरोखरीच आगळावेगळा ‘अपूर्व’ ग्रंथ सिद्ध झाला. यातील सर्व लेख म्हणजे त्यांच्या भावऊर्मीच होत. प्रत्येक लेख स्वतंत्र ; एकाचा दुसऱ्याशी अनुबंध नाही. पुस्तकाचं कोणतंही पान उघडा, दिसेल तो लेख वाचा आणि भावसमृद्ध व्हा. किती छान व अपारंपरिक हे लेखन!

त्यांच्या या विलक्षण, नवलपूर्ण लेखनाच्या यशाबद्दल मी माझ्या हृदयाच्या अंतरहृदयापासून विजयाताईंचं (माझ्या वयोज्येष्ठतेचा लाभ घेऊन) कौतुक करतो. ‘‘चिरंजीव विजयाताई, अशाच लिहित्या राहा! देवी शारदेचा असाच वरदहस्त तुमच्या प्रज्ञाप्रतिभासंपन्न मस्तकावर राहो! तुमचं पुन्हा एकवार अभिनंदन; तुम्हास माझ्या अनेक शुभेच्छा!’’

 

आपला

द. दि. पुंडे

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बारोमास

ले :- सदानंद देशमुख

बारोमास लेखक सदानंद देशमुख यांची कादंबरी तिला 2004 साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे .बारोमास अगदी या सुरुवातीच्या शब्दापासूनच बारा ही महिने शेतकरी आणि शेती यांचे अतूट नाते आणि शेतीच्या जीवनातील बाराही महिने सतावनाऱ्या वेदना , समस्या , अडचणी इ, चे वास्तव चित्रण या कादंबरीतून व्यक्त केले आहे . शेतकरी जीवनाची भयानक परिस्थिती प्रत्यक्ष अनुभव देणारी आहे . आजन्म आपले जीवन शेतीसाठी आपले जीवन वाहून देणाऱ्या शेतकऱ्यांची मनस्थिती येथे बघावयास मिळते .
बारोमास मध्ये आलेला उच्चशिक्षि नायक एकनाथ त्याची होणारी कुंचमबना ,त्याच्या नशीबी आलेले हाल , नोकरी मिळवण्यासाठी त्याची धडपड. आपल्याला अस्वस्थ करणारी आहे. शिकलेला असल्याने शहरातील शिकलेली मुलगी बायको करून आणलेली अलका , परिस्थिती बिकट असल्याने तिला तिच्या मनासारखे जीवन आपण देऊ शकत नाही , तिचे जीवन आपण बरबाद केले आहे असे वाटत असते , एक विचार असही वाटत की बळीमामाची मुलगी मुक्ता शी लग्न केले असते तर बरं झालं असत तिने शेतात तरी काम केलं असत , भावाची मुलगी केली नही म्हणून शेवंता माई जाणून बुजून त्या गोष्टींचा वचपा ती अलका शी वागून काढते , मुक्ता चे दारुड्या सोबत लग्न झाले त्याने शेती विकली , मुक्तला होणार त्रास बघूज वाईट वाटते ती मोलमजुरी करून कसा बस संसार चा गाडा ओढत आहे , मनोमन मनात झुरत असते , एकनाथ ला अलका आणि मुक्ता या दोघींचे दुःख बघवत नही आणि स्वतःला दोष देत आहे मुक्ता शी लग्न केले असते तर आपण सुखी झालो असतो असंही वाटत आपण तिला ही दुःखी केले आणि अल्काला ही दुःखी केले आपण दोघींचे गुन्हेगार आहोत .
एकनाथ च जीवन म्हणजे जसा माणूस भेटेल त्या भाषेत आपण बोलतो आपण म्हणजे पाणी जसा संग तसा रंग ! भोगी तशी रात आपली भोगी तशी रात...! आपल्या प्रमाणे च शिकलेला व नोकरी साठी सतत पैसे मिळवण्यासाठी त्यांची धडपड असते परंतु तो मधून कुणाशीही भीती न बाळगता सगळी दुनिया आपल्या मुठीत असल्यासारखं राहते बेन हा मध्य म्हणजे वैरीच वाटतो आपल्या सात जन्मचस साल पाठीवर भाऊ असं म्हणजे एक तापच ज्याला नाही त्याला वाटते भाऊ असावा आहे त्याला वाटत नसावा पाठी वरचा भाऊ म्हणजे असून अडचण नसून खोळंबा..!
मधु नोकरीसाठी डोनेशन जमा करण्यासाठी रात्री धन शोधत असणारी सिनेरी टोळीत शामिल होतो बनुबा , दिलीप पवार , मधु तनपुरे , दम्या , नथु मोगल , रोद्या , तेजस , सावळा मंगल ही सोनेरी टोळीतील मेंबर सर्व शिकलेले सवरलेली तरुण मूल
परिस्थिती माणसाला कुठे आणि काय करायला भाग पाडेल सांगता येत नाही. धन शोधताना बनवण्यात येणारी काजळी त्यासाठी लागणारे साहित्य मासे ,घुबडा चे डोळे ते भाजून बनववलेली काजळी , मध्य रात्रीची भयानक चालून , भीती जनक दृश्य डोळ्यासमोर उभे राहते , रात्री येणारे अनेक भयानक भीतीचे वातावरण मन थरकापुन टाकतात वाचताना स्वतः भोवतीच ती परिस्थिती निर्माण करणारे वातावरण आहे
हेच धन शोधत जमीन खोदत असताना दिलीप पवार सोबत घडलेला प्रसंग मनाला चिर करून आवडतो ,त्याची मानसिक स्थिती बिघडून तो वेड्या सारखे वागतो घरची परिस्थिती नाजूक असल्याने धन शोधून डोनेशन भरून नोकरी मिळवण्याचे ध्येय अपूर्णच राहिले , हे बघून दिलीप आणि त्याची आई ची स्थिती काळजाला भिडणारी आहे त्याची फार कीव येते , आणि अजूनही ती रात्र विसरलेला नही भूत भूत ,, सापळा सापळा,, धन धन ,, करत नोकरी करत रस्त्यावर फिरत आहे नोकरी मिळवून मित्र ला ही नोकरी मिळवून देण्याचे स्वप्न घेऊन फिरत आहे
अडाणी सासू आणि शहरातील सुशिक्षित बायको यांचे नेहमी भांडण एकनाथ ला कासावीस करून सोडणारे आहे , खूप वाईट वाटत आपण सुशिक्षित तरी आपल्या घरात अजून हे अस पारंपरिक मागासलेपणा खूप जीवाला लागते पण आपलं शिक्षण म्हणजे फक्त काही काच नही आर्थिक लाभ काय ,,? तर शून्य ,,,,, मानसिक त्रास किती ? शंभर टक्के%.... आणि हेच खरं आहे अगदी आजही असेच सुरू आहे , असे जीवन जगत असताना एक वेळ मरण आलेलं बर ,, असंही वाटत नोकरी मिळवण्यासाठी जागो जागी डोनेशन आडवं आलं , आणि अजूनही येत आहेत , शहरातील पगार कमावणारे आणि सुशिक्षित बेकार शेतकरी यात तुलना करताना तेजराव खपके म्हणतात ते सुखी आणि आपण दुःखी ,, आशण आपल्या देशात क्रांती होईल आणि ती क्रांती बेसुत लोकांची असलं सुतावर नसल्या सारखी आणि नुसती कापाकापी, झपका झापकी ...! एकनाथ नाथभाऊ चा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो त्याच्या प्रमाणे आपण ही नवीन प्रयोग करावे शेतीला वाहून द्यावे असे वाटत शेतीच व्यवसाय म्हणजे एक लढाई च असते ..
कादंबरीत असलेल्या शेतीचे वर्णन भकास आनि रखरखीत असे फक्त दुष्काळ सोसणारी ती जमीन तेथील झाडे त्यांनाही तोडून टाकल्याने शेतीला भकास असे वर्णन मन उदास करते , हंगामाच्या हाती त्याच्या पैशाची दिढि एकत्रित करूनही हातात पाच रुपये राहत नाही आपल्या नशीबातील हे येन आजूक किती दिवस चालणार ? बारोमास राबून ही आपली कडकी अन छातीतील धडकी दूर होत नाही कधीच सुखाच्या घास भेटत नही तर आपण जगतो तरी कशासाठी ? चालताना त्याचे पायात पाय अडकत जातात फक्त , अशी सर्व वाईट परिस्थिती असल्याने आपण आपल्या पत्नीला कोणतेही सुख देऊ शकत नाही घरच्यांना ही सुख देऊ शकत नाही बायको असतानाही कोणत्याही प्रकारच सुख शारीरिक , मानसिक सुख अनुभवू शकत नही या साऱ्या ने एकनाथ चा एकटेपणा बघून फार वाईट वाटले
शेतीच्या बी बियाणं साठी घरातील डाग दागिने मोडून घरातील स्त्रीयांची मन दुखावतात शेतीच्या बियानासाठी आलकाच्या माहेरून भेटलेल्या सोन्याच्या बांगड्या साठी तिची होणारी कुंचमबना , सगळं कसं भीती दायक आहे बांगड्या साठीं मला मारतील जीव घेतील , लहान दिराच मार खाते हे फसरच भीती दायक आहे अशी परिस्थिती कुणावर न येवो , शेतीसाठी सावकार कडून कर्जबाजारी होणारे शेतकरी अगदी लाचार होतात कर्ज बाजरी असल्याने आपल्या बहिणी च नवरा राव साहेब ची आत्महत्या केली आणि बायको पोरांना वाऱ्यावर सोडले पुढील आयुष्य आता त्यांनी कस जगावं कुणाच्या भरवश्यावर ?? असे अनेक सारे प्रश्न ???
ग्रामीण भागातील दुष्काळ भाग सांजोळ आणि शहरी भागातील असणारे मोहाडी यातील जीवन माणसातील जीवन जगण्यातील फरक अप्रतिम शब्दात मांडला आहे आजच्या परिस्थितील कोण कोणाला खरे सांगत नाही लोकांची मानसिकता अशी असते की लोक खर लपवतात खोट दाखवतात .
आज ही गावातील शिकलेल्या तरुण पोरांची बेकार अवस्था त्यामुळे धंद्याची ही मारामार च बारोमास नुसती कडकी आणि रडारड कायमस्वरूपी चे नशिबी फक्त दुःख च दुःख , हालाकीच्या परिस्थितीत आपल्या घरातील असणारे जनावरे त्यांचे चित्रण फार हुबेहूब डोळ्यासमोर उभे करतात घरातील असणारी चन्द्री मांजर , मालकाच्या जीव वाचनवसाठी ऐड्रींन पिऊन मरण स्वतःहा वर ओढून घेते , गोठ्यातील गाय , म्हैस , बैल यांचे होणारी उपासमार बघवत नही , फक्त पैशासाठी भल्या मोठ्या मायेन वाढवलेल्या झाडांची तोडणी होताना अगदी आपल्या काळजावर कुऱ्हाडीने घाव होत आहे असं वाटत धन खोदताना सापडलेली लावण्यवती सुंदर स्त्री मूर्तीचे वर्णन मनाला मोहून टाकणारे आहे अप्रतिम सुंदर आहे, सगळ्या शेतकऱ्यांचे दुःख एकच असते शेतीचा धंदा तोट्याचा , कोणतीच बरकत नही जिकडे बघावं तिकडे दुष्काळ बारोमास डोक्यात एक च विषय शेतीचा, कर्ज , बी बियाणे, शेतीसाठी पाणी , उसनवारी हेच सर्व डोक्यात असल्यावर शेतकरी सुधारत नही त्याच्या बायको मुलं ही अगदी झाडाच्या सालीसारखी झालेली नोकरी मिळवण्यासाठी मधून कल्याणी च मळा दोन लाख ला गहाण ठेवतो आपल्या आई वडिलांचा किती जीव आहे त्य शेतीत हे माहीत असतानाही मधु तिच्यावर कर्ज उचलतो आणि आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी काहीही करायला तयार होतात किती मोठं मन असत आई बापच,
एकनाथ मात्र दूर वर वेगाने विचार करतो तशी हजार किलोमीटर वेगाने वर खाली जाणारे भोवताली कश्याच काहीच अस्तित्व नही फक्त अथांग अशी मोठीपोकळी आणि त्या पोकळीत आपण अस्तित्वाचा फक्त पिवळा गोळा त्यात आपलं काहीच अस्तित्व नाही , असे कसतरी भयाण आणि भेसूर आयुष्य,, सर्व काही करून नही नोकरी मिळत नाही त्या नोकरी साठी आपण अर्धं आयुष्य गेलं तरी अजून नोकरी नही आता तर मरायची वेळ आली अन क्षयाची नोकरी धरून बसले , हताश आणि निराश झालेला एकनाथ हिरमुसला जातो नोकरी साठी रात्र रात्र न झोपणारा डोक्यात सतत विचारांचं वावटळ जिकडे तिकडे फक्त निराश गावात होणारी पराकोटीच परकेपन जाणवू लागलं आता आपण जावं तरी कुठं , घरी ताप , दारी ताप शेतावर ताप आपण जावं तरी कुठं सगळीकडे फक्त प्रश्न चिन्ह , एकनाथ शेतकरी संघटनेत भाषणे करू लागला मोर्चा करू लागला आहे स्वतःहा शेती शेती संघटनेत स्वतः ला झोकून तो किती किती दिवस घरी येत नाही त्यासाठी त्याला जेल होते , मधु मात्र आता जमीन खोदत धन शोधण्यात काम सोडून रस्त्याने जाण्याच्या गाड्या कडे बघून आता त्या गाडीत असणाऱ्या माणसाकडे असणारे सोने नाणे चोरण्याचे ठरवतो , दिलीप पवार रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याकडे बोट करतो ह्या सर्व आपल्या गाड्या धन नोकरी मित्रासाठी नोकरी देईल शाळा बांधेन असे ओरडत रस्त्याने फिरत आहेत शेवंतां माय मात्र घरात एक लाख रुपयांना राखण असलेली असे दिवस रात्र नवरा दोन मुलांची वाट बघत असते एक दिवस मात्र नवरा सुभानराव घरीच येत नाही तेव्हा तीच जिवाची होणारी खळबळ आरडाओरडा नको नको ते विचार तिच्या मनात येतात सुभानराव ने ऐड्रींन पिल्याचे आठवत आणि तीच मन थरकापू लागले सगळी कडे फक उदास वातावरण निर्माण झाले ,
बारोमास फक्त कष्ट, दुःख, दुष्काळ च दुष्काळ
कादंबरी वाचत असताना एकनाथ अलका सोबत प्रसंग सोनेरी टोळीचे रात्रीचे थरारक चित्रण भीती निर्माण करणारे आहे दिलीप पवार चे वेड होन ममता वारे ची मनस्थिती घरातील चन्द्री मांजर चे सुधारण्यासाठी अनेक प्रसंग मनाला चिर करतात सासरी गेलेला एकनाथ मोहाडीतील वातावरण , परिस्थिती चे वर्णन अप्रतिम आहे शेतकरी संघटनेचे मोर्चे बहिणीच्या नवरा आत्महत्या , इ कादंबरी असलेले सर्व च प्रसंग अप्रतिम आहे मनाला भिडणारे आहे प्रत्येक प्रसंग एक वेगळा संदेश देणारे आहे , कादंबरीत असलेले सर्व च पात्र वास्तव प्रकट करणारे आहे शेवटी पर्यंत एक शेतकरी कुटुंबाला लाभलेला बारोमास कष्ट , निराशा , हतबल असेच आजन्म जगावे लागते
कादंबरी ची भाषा साधी सोपी असल्याने वाचताना कोणतीच अडचण आली नाही फारच सुंदर आहे कादंबरी प्रत्येक प्रसंग नवीन धडा शिकवून जाणारा आहे , शेवट पर्यंत हार न मानणारा एकनाथ , मनावर दगड ठेवून , सर्व सहन करून हिमतीने जगणारा एकनाथ खरच खूपच विचारी आहे ,
मला फार आनंद होत आहे की मी आपली कादंबरी वाचली तुमचे लेखन अप्रतिम आहे मनाला भिडणारे आहे , आणि आजही हीच परिस्थिती प्रत्येक शिकलेल्या तरुणाई भोगत आहे , ज्ञान असून ते इतरांना देता येत नाही , जिकडेतिकडे फक्त भ्रष्टाचार ,,
मी आपले आभार मानते की आपण एवढ्या छान कादंबरी चे लेखन केले .

कु. पूजा बाळू लिलके
( नाशिक )

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

jo bhaje

डॉ, अंजली जोशी यांनी लिहिलेलं 'जो भजे सूर को सदा ' हे पुस्तक नुकतंच वाचून संपलं, ते वाचल्यावर मनात उमटलेले विचार कळवण्यासाठी हा लेखनप्रपंच.....
आजच्या सांगितीक वातावरणात अशा पुस्तकाची खरोखरच गरज होती. बालगायकांना मिळणारी वारेमाप प्रसिद्धी पाहून अनेक मुलं, त्याहीपेक्षा त्यांचे पालक या क्षेत्राकडे वळतात. मुळात शास्त्रीय संगीत हा गम्भीर विषय आहे, याचे भानही या मंडळीना नसते. ते गांभीर्य समजावून सांगायची गरज होती. हे केवळ मागे होऊन गेलेल्या महान गायकांच्या कथा सांगून जमले नसते.
असा गायनप्रिय समूह हेरून आज प्रसिद्धी पावलेल्या गायकांची उदाहरणे देऊन हा विषय पटवून सांगण्याचं काम हे पुस्तक करते. यासाठी अंजलीने केलेली तिन्ही गायकांची निवड योग्य आहे. त्यांच्या संगीत साधनेविषयी लिहिताना लेखिका आपल्या उद्दिष्टापासून तसूभरही हलत नाही. रंजक असूनही कुठेही विषयाचं गांभीर्य ढळत नाही.
हा तोल सांभाळत लिहिलेल्या या पुस्तकासाठी डॉ. अंजली जोशी अभिनंदनास पात्र आहेत.

- उमा वि. कुलकर्णी

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार अंजली,
"जो भजे सूर को सदा"

या त्रिमितीतील आकर्षक, लक्ष वेधून घेणारे शब्द दिसले आणि लगेच मुखपृष्ठावरील संगीतमय सारेगमपदनिसा कडे लक्ष वेधले. शास्त्रीय संगीताचं मला ज्ञान असं काहीच नाही, पण कान मात्र चांगला आहे आणि मनाला शास्त्रीय संगीताने आनंद मिळतो . त्यामुळे हे पुस्तक हातात घेतलं आणि त्यातल्या ऋणनिर्देश पासून वाचायला सुरुवात केली. जिवलग मित्रांची मनोगतं वाचली.तुझं मैफिलीचं प्रास्ताविक वाचलं आणि लेख वाचायला सुरुवात केली.
विषयनायकांची छान ओळख करुन दिलीय. त्यांचं पूर्ण कुटुंब, त्यांचा मित्रपरिवार, त्यांची सांगितिक कारकीर्द, कौटुंबिक प्रवास अशा विविध पैलूंचा परिचय होतो. त्यांच्याबद्दल, माझ्यासारख्या अनेकांना उत्सुकता असेल, अशी माहिती अक्षर स्वरुपात तुम्ही मांडली आहे. सोबत दृश्य परिचय करून देणारे वेगवेगळे फोटो आहेत. त्याच्यामुळे शब्दांमधला जिवंतपणा अजूनही वाढला आहे. शास्त्रीय संगीताविषयी बोलता बोलता तू जी माहिती दिली आहे, त्यावरून तुझाही संगीतातला अभ्यास जाणवतो आणि आवडही उत्तम आहे, हे लक्षात येतं.
हे पुस्तक वाचून माझ्यासारख्या अनेकांची, याविषयी माहिती करून घेण्याची उत्सुकता निश्चितच पूर्ण होईल.तुमचा उपक्रम अतिशय अभिनंदनीय आणि माझ्यासारख्या अनेकांना आनंद देणारा असा आहे. तुमचं मनापासून अभिनंदन!

... निशिकांत कुलकर्णी, लातूर

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Jo Bhaje - Abhipray

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भवचक्र

Bhavchakra

प्रियांका,

तू पुस्तक लेखन करतेस…, खरे तर तू कसे लिहितेस हे वाचायला मी ‘भवचक्र’ वाचायला घेतले. नाही तर माझ्या ‘सिलेक्टिव्ह रिडिंग’मध्ये मी ललित वाचनापासून दूरच आहे. पण ‘भवचक्र’वाचायला घेतले, आणि मला त्याचा लेखकच दिसेना. एका ‘थीम’ने हे पुस्तक गुंफले आहे. त्यात चूकांना जागा नाही. इतिहास आणि वर्तमान दोन्हीही रंजित न करता, वास्तवात सादर केले आहेत. उगीच भावना भडकवल्या नाहीत, आणि उगीच पांडित्याचा आव नाही, आणि लेखिका आहे असे प्रदर्शनही नाही. पण समतोल लेखकच हे करू शकतो.

एक सुंदर पुस्तक, ते खरेच वाटावे असे वाचल्याचा आनंद मिळालाय मला. तुझे मनापासून अभिनंदन, आणि तुझ्या पुढील लेखनास शुभेच्छा!

 

डॉ. आमोद साने

CEO, ग्रीन फार्मसी, पुणे

-------------

'भवचक्र 'वाचून, छान कादंबरी वाचल्याचा आनंद मिळाला. गणपती मूर्तिचा प्रवास खूप चांगले वर्णन केले आहे.कादंबरी प्रवाही आहे.कारण उपकथानके नाहीत. मनोहर, शांतक्का, दगडू ते प्रथमेश पात्रे छान रंगवली आहेत.
कादंबरीत उपकथानक नसली तरी कथानकाला पूरक गोव्याचा इतिहास आणि भूगोल याचा उपयोग छान केला आहे.तसेच काळानुरूप बदलत्या सामाजिक परिस्थितीचा वापर कौतुकास्पद. यासाठी खूप अभ्यास आणि कष्ट घेतले असणार.
गोव्यातील गावांची मूळ नावे आणि प्रचलित नावे माहित झालीत. कथेच्या ओघात वापरलेल्या कोकणी शब्दांचे अर्थ तळटीपेत दिले हे छान झाले. मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो ते 'माटोळी 'सारख्या गणपती उत्सवातील छान प्रथेची माहिती मिळाली.
सावल्या, मोक्ष, भवचक्र हा आलेख यापुढे असाच चढता राहो.
हार्दिक शुभेच्छा.
- शाम पठाडे

-------------

Hello प्रयांका, तुझी कादंबरी वाचली. खूपच छान आहे.
कादंबरीत शेवट्पर्यंत उत्सुकता लागून राहते. काही वाक्ये फार सुरेख आहेत. उदा.रावसाहेबांच्या धंद्यातील आणि मनातील ग्रहाबरोबर अर्थातच मूर्तीचे ग्रहही बदलले किंवा कोणत्याही मजहबचा भगवान कधी दंगे फसाद करायला शिकवत नाही. मजहबचे कारण सांगून माणसेच दंगे फसाद करतात. नेहमीच्या विषयापेक्षा वेगळा विषय असलेली ही कादंबरी नक्कीच कादंबरी वाचनीय आहे.
- ममता कोल्हटकर

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


शिवरायांच्या मावळ्यांना प्रकाशात आणणारा इतिहास अभ्यासक : डॉ. सचिन पोवार (शिरोळे)

Shivchatrapatinche Shiledar


‘‘जय भवानी जय शिवाजी’’ हि स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रक्षेपित होणारी मालिका चांगलीच लोकप्रिय होत आहे. आजवर छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर बऱ्याच मालिका चित्रपट बनवले गेले. पण छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा इतिहास कथन करणारी हि पहिलीच मालिका या मालिकेतील ऐतिहासिक माहितीचा मुख्य स्रोत आहे डॉ. सचिन पोवार लिखित ‘‘शिवछत्रपतींचे शिलेदार’’ हे पुस्तक. आजवर महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यकारानी आणि इतिहासकारानी शिवरायांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यावर विपुल अशी साहित्यसंपदा निर्माण केली. पण शिवरायांच्या खांद्याला खांदा भिडवून रणांगणी अतीव शौर्याने लढणाऱ्या त्यांच्या मावळ्यांचा जीवनपट मात्र यापूर्वी विस्ताराने कुणी रेखाटला नव्हता. शिवरायांच्या मावल्यांचा संपूर्ण जीवनपट अगदी विस्ताराने सहसंदर्भ रेखाटण्याचा प्रथम मान जातो तो कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरीचे इतिहास अभ्यासक डॉ. सचिन पोवार यांना. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पोवार सरांनी २००५ साली मावळ्यांच्यावरील संशोधनाला प्रारंभ केला. तब्बल ७ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर साकार झाले ‘‘शिवछत्रपतींचे शिलेदार’’ हे त्यांचे पुस्तक. सदर पुस्तकात शिवरायांच्या २७ मावळ्यांचा जीवनपट त्यांनी अगदी विस्ताराने मांडला आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकात शिवरायांच्या मावळ्यांची मूळ नावे, गावे, त्यांची कूळ पुरुष, शिवरायांच्या चाकरीत ते कसे दाखल झाले? आपणास ज्ञात असलेल्या कामगिरीशिवाय हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी कोणकोणत्या कामगिऱ्या बजावल्या? त्यांचा मृत्यू नेमका कधी व कसा झाला इत्यादि विषयी विपुल माहिती सहसंदर्भ वाचावयास मिळते. याशिवाय सरसेनापती नेताजी पालकर यांनी मुस्लीम धर्माचा स्वीकार केला होता का? फिरंगोजींना राजांनी तोफेच्या तोंडी दिले होते का? सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अवघ्या सहा शिलेदारानिशी बहलोल खानच्या अजस्र फौजेवर का हल्ला केला? या व यासारख्या इतिहास पुरुषांनी अनुत्तरीत ठेवलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांनी सदरच्या पुस्तकात दिलेली आहे. शिवरायाच्या मावळ्यांचा खरा इतिहास सहसंदर्भ जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा ‘‘शिवछत्रपतींचे शिलेदार’’ हे पुस्तक.

- गौरव जाधव

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्यक्तिरंग – डॉ. कुमार सप्तर्षी

महत्त्वाचे आणि वेधक

Vyaktirang

‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’ने ‘व्यक्तिरंग’ हे डॉ. कुमार सप्तर्षी यांचे नुकतेच प्रसिद्ध केलेले पुस्तक आवडले. ते महत्त्वाचे आणि वेधक आहे. महत्त्वाचे एवढ्यासाठी की महाराष्ट्राचे शासन सांभाळणाऱ्या वसंतदादा पाटील, शरद पवार अशा चार मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी लिहिले आहे. त्यांना जवळून पाहून त्यांच्या व्यक्तित्वाविषरी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांविषयी ते लिहितात.

जय प्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, एस्‌. एम. जोशी यांच्यासारख्या व्यक्तींनी भारतीय समाजमानसाचा अभ्यास केला होता. त्यांनी भारतीय समाजजीवनाची नव्या समतावादी जाणिवांतून जडणघडण करण्याचा प्रयत्न केला. या विषयी ते पुस्तकात मोकळेपणाने बोलतात. या थोर व्यक्तींनी त्यांच्या स्वत:च्या जीवनाला कसे वळण लावले याबद्दलही ते सांगतात.

एकवीस व्यक्तींविषयी त्यांनी लिहिले आहे. काही राजकीय सामाजिक जीवन घडवणाऱ्या. काही रूढ अर्थाने सामान्य वाटल्या तरी मोठे आदर्श उराशी बाळगून जगणाऱ्या. माणूसपणाची प्रतिष्ठा जपणारे आणि शोषितांबद्दल कळवळा बाळगणारे डॉ. सप्तर्षी यांचे व्यक्तिमत्त्वही झळाळून उभे राहाते. वाङ्मयीन, सामाजिक – दोन्ही दृष्टींनी महत्त्वाचे असे हे लेखन.

स्वत:चे जीवन बदलण्यासाठी बिहारमधून महाराष्ट्रात आलेला आणि नंतर कोमेजलेला सुखदेव मनाला चटका लावून जातो. जांबुवंतराव धोटे हा अवलिया अफलातून. जॉर्ज फर्नांडिस यांचे एका वेगळ्या प्रकाशात दर्शन घडते.

डॉ. सप्तर्षी ‘सत्याग्रही’ या वैचारिक मासिकाचे संपादक म्हणून अग्रलेख लिहितात. त्यात विचारसरणी, राजकीय गुंतागुंती आणि महत्त्वाच्या घडामोडी असतात. तरीही तो वेधक असतो. व्यक्तिचित्रांचे त्यांचे पुस्तक वेधक बनले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. हे पुस्तक वाचकांना आवडेल आणि त्यांची सामाजिक राजकीय जाणीव समृद्ध करेल.

 

-    डॉ. अंजली सोमण

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

`भैरप्पा साहित्य: मराठी समीक्षा’ - संपादन: उमा कुलकर्णी.

Bhairappa

पुस्तकं वाचून जगता येत नाही’ हे जितकं खरं आहे तितकंच ‘पुस्तकांवाचून जगता येत नाही’ हेही खरं आहे. आपल्या इवल्याश्या आयुष्यात किती आणि कोणती पुस्तकं वाचायची हा एक मोठाच प्रश्न असतो. निव्वळ मातृभाषा अवगत असल्याने वाचनाचा परीघ आक्रसत असला तरीही अनुवादित पुस्तकांमुळे इतर भाषांमधील पुस्तकांची ओळखही विनासायास घडू शकते. म्हणजे पुन्हा किती अन् काय वाचायचं हा प्रश्न शिल्लक उरतोच. मात्र यावर उपाय सापडतो तोही पुस्तकांमुळेच!

 

डॉ. एस. एल. भैरप्पा ह्यांच्या कादंबर्‍यांच्या मोठ्या आकारमानामुळे त्या वाचण्याइतका सलग वेळ काढता येणं अवघड आहे हे लक्षात आल्यानंतर चुटपुट वाटत राहिली, की आता कधी बरं वाचायचं त्यांचं साहित्य? हे पुस्तक प्रकाशित झाल्याचं समजलं आणि हायसं वाटलं. त्यांचं आत्मचरित्र वाचल्यानंतर वाटत होतं की किमान त्यांच्या साहित्याची तोंडओळख तरी व्हावी ही इच्छा ह्या पुस्तकाने, 'भैरप्पा साहित्य: मराठी समीक्षा’, पूर्ण झाली.

 

भैरप्पा यांचं लेखन मुख्यत्त्वेकरून कादंबरी स्वरूपातील आहे, तसंच त्यांनी आत्मचरित्रही लिहिलं आहे. ह्यापैकी निम्म्याहून अधिक कादंबर्‍या आणि आत्मचरित्र अनुवाद-रूपाने मराठी भाषेत उपलब्ध झाली आहेत. ह्या सगळ्या पुस्तकांविषयीच्या मराठी समीक्षा-लेखांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १ डिसेंबर २०१७ रोजी कॉन्टिनेन्टल प्रकाशनने काढली असून रु.२००/- किंमतीच्या, १९९ पृष्ठांच्या पुस्तकाला डॉ. द. दि. पुंडे यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

 

कन्नड साहित्यात डॉ. एस. एल. भैरप्पा ह्यांच्या कादंबर्‍या लोकप्रिय आहेत. त्याचं एक उदाहरण म्हणजे ‘अष्टावधानी’ ह्या बौध्दिक खेळाचा डॉ. आर. गणेश यांनी केलेला प्रयोग आणि सुमारे दीडहजार भैरप्पा-प्रेमींची ह्या खेळाला असणारी उपस्थिती! ह्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या साहित्यातील ‘भारतीयत्व’ असावं असं संपादक उमा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

ह्या पुस्तकात काय काय आहे?

-- भैरप्पांचं आत्मचरित्र आणि कादंबर्‍यांवर लिहिलेले एकूण १५ लेख,

-- अखिल भारतीय कन्नड साहित्यसंमेलनातील भैरप्पांच्या भाषणाचा संक्षिप्त अंश,

-- भैरप्पांची मुलाखत,  --लेखिका-संपादिका उमा कुलकर्णींचा तसेच ह्या पुस्तकात लेख लिहिणार्‍या लेखकांचा परिचय.

 

माझं नाव भैरप्पा’ (आत्मचरित्र), ‘धर्मश्री’, ‘वंशवृक्ष’ (२), ‘पारखा’ (२), ‘परिशोध’, ‘पर्व’, ‘जा ओलांडुनी’, ‘तंतू’, ‘काठ’, ‘मंद्र’ (२), ‘आवरण’, ‘तडा’ ह्या पुस्तकांचे  लेख साहित्याच्या निरनिराळ्या अभ्यासकांनी आणि मानसशास्त्रज्ञ असलेल्या मुंबईच्या डॉ. अंजली जोशी यांनी लिहिले आहेत.

एखाद्या साहित्यिकाचा मानसशास्त्राच्या अभ्यासकाने आत्मचरित्राच्या सहाय्याने केलेला अभ्यास मी तरी पहिल्यांदाच बघितला-वाचला-आवडला.

 

ह्या सर्व लेखांपैकी मला सर्वांत जास्त आवडलेले लेख -

पर्व’बद्दल डॉ. अरूणा ढेरेंचा लेख आणि ‘धर्मश्री’बद्दल पुण्याच्या डॉ. अंजली जोशी यांचा.

 

भैरप्पा यांच्या साहित्यावर मराठी स्नातकोत्तर अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना अशा एकत्रित लेखनाची गरज भासते’ ह्या संपादक उमा कुलकर्णींच्या अनुभवातून पुस्तकरूपाने हे सगळे लेख एकत्रितपणे उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी आजवर भैरप्पा वाचलेले नाहीत अशा माझ्यासारख्या वाचकांना भारतीय साहित्यातील एका महत्त्वाच्या लेखकाच्या साहित्याचा परिचय करून घेण्यासाठीदेखील हे पुस्तक नक्कीच उपयोगी आहे.

 

-चित्रा राजेन्द्र जोशी.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भारुडाचे गारुड

Bharudatil Garud

समाजाला नैतिकता शिकवण्यासाठी संत मंडळींनी अनेक मार्ग अवलंबिले. शिकवण रुक्ष असेल तर ती लवकर पोचत नाही. ती रंजक असेल तर स्वीकारले जाण्याची शक्यता वाढते याची जाणीव भागवत संप्रदायातील सर्व संतांना होती. ही शिकवण पोचवण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग वापरले गेले त्यातील एक लोकप्रिय मार्ग म्हणजे भारुड. या प्रकारात एक वेगळी नाट्यमयता असल्यामुळे हा प्रकार विशेषत्वाने लोकप्रिय झाला. भारुड शब्दाच्या अनेक व्युत्पत्या सांगितल्या जातात. बहुरूढ म्हणून भारुड, भारडी समाज गातो म्हणून भारुड ते भारुंड नावाच्या त्द्विमुखी पक्षाप्रमाणे आतून दोन अर्थ निघतात म्हणून ते भारुड अशी वेगवेगळी शाब्दिक समर्थने दिली जातात.श्री संत एकनाथ महाराजांनी हा प्रकार महाराष्ट्रात घरोघरी लिहिला. त्यांचे” विंचू चावला” हे भारुड ऐकले नाही अशी व्यक्ती सापडणे अवघड.कालौघात हा प्रकार विस्मृतीत जाऊ लागला होता. त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी इंडियन नॅशनल थिएटर व कैलासवासी अशोकजी परांजपे यांनी विशेष प्रयत्न केले. या पुनरुज्जीवनाचा एक धागा आपल्या पंढरपुरात निर्माण झाला वाढला व राष्ट्रपती भवनापर्यंत पोचला. भारुडाचा बुरगुंडा वाढवणारी ही माऊली म्हणजे आपल्या चंदाबाई तिवाडी. बुरगुंडा हा कैकाडी भाषेतला शब्द आहे. मुलगा हा त्याचा लौकिक अर्थ तर ज्ञान हा अध्यात्मिक अर्थ.भारुडाच्या लोकप्रियतेवर ती आरुढ होऊन पंढरपुरातील एका मनस्विनीचा सोलापुरातील नगरेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या याचम वाड्यात सुरू झालेला प्रवास संगीत नाटक अकादमी पुरस्कार व राष्ट्रपती भवन या पर्यंत कसा जाऊन पोहोचला त्याचा आलेख पवन कुमार झंवर या उदयन्मुख लेखकाने” भारूडातील वादळ चंदा ताई….” या आपल्या पुस्तकाद्वारे मांडला आहे. पुण्यातील ख्यातकीर्त कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने नुकतेच पंढरपुरातील एका कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन केले.
मारवाडी समाज हा तसा थोडासा कर्मठ व परंपरानिष्ठ आहे. या समाजात जन्म होऊन, फारसे लौकिक शिक्षण झाले नसतानाही चौकस बुद्धी, लोकांकडून ऐकून घेण्याची व शिकण्याची तयारी व ज्ञानलालसा याच्या जोरावर चंदाताई तिवाडी यांचा हा प्रवास झाला. या पुस्तकाच्या निमित्ताने भारुड या लोककलेच्या एका काहीशा दुर्लक्षित प्रकाराकडे पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधले जात आहे हे चांगलेच आहे.चंदाताई म्हणजे भारुड असे समीकरण गेल्या काही वर्षात रूढ झाले आहे. परंतु भारुड अभ्यासाबरोबरच चंदा बाईंना पुरुष प्रधान संस्कृती, रूढी ग्रस्त समाज, समाजातील आर्थिक विषमता यांनाही कसे तोंड द्यावे लागले त्याचा आलेख ही या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतो आणि हा प्रवास किती खडतर होता हे जाणवते. गृहनिर्माण व रोजगार निर्मिती हे आजच्या काळातील दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. चंदा बाईंनी या दोन प्रश्नांकडे कसे पाहिले. त्यावर काहीतरी तोडगा काढण्याचे एकविरा टेलरिंग फर्म व इंदिरा गृहनिर्माण संस्था यांच्या माध्यमातून काय प्रयत्न केले. त्यांच्या या खारीच्या प्रयत्नांना अडथळा आणण्याचे तथाकथित प्रस्थापितांनी कसे प्रयत्न केले ,चंदा ताईंनी चिकाटी व अफाट लोकसंग्रह यांच्या बळावर हे प्रयत्न कसे मोडून पाडले, हा सर्व इतिहास मुळातून वाचण्यासारखा आहे.लेखक पवन कुमार जवळ यांनी चंदाताईंचा स्थायीभाव असलेला त्यांचा उत्स्फूर्तपणा विविध प्रसंगातून व्यवस्थित दाखवला आहे. त्यांचे हे दुसरे पुस्तक. पहिले पुस्तक अमेरिकेच्या प्रवास वर्णनावर होते. आता दुसरे पुस्तक हे या चंद्रभागेचा प्रवास रेखाटणारे आहे. साध्या प्रवासवर्णनापेक्षा व्यक्तीचा प्रवास रेखाटणे हे तसे आव्हानात्मक. परंतु चंदा ताईंची प्रदीर्घ चर्चा करून अनेक संदर्भ गोळा करत पवननी ही वाटचाल सर्व वळणांसह व्यवस्थित दाखवली आहे. या पुस्तकात एडवोकेट डॉक्टर नारायणराव बडवे यांचा चंदाबाईंचे भारुडातील गुरु म्हणून उल्लेख आला आहे .त्यांनी चंदाबाईना भारूडाचे कसे व काय शिक्षण दिले त्याबद्दल थोडे विस्ताराने यायला हवे होते. पुस्तकात मुद्रितशोधनाच्या काही ढोबळ चुका ही झाल्या आहेत. त्या टाळता आल्या असत्या.
चंदाबाई व पवन नी मिळून भारुडाचा बुरगुंडा आपल्यासमोर उकलताना साठ-सत्तर वर्षांपूर्वीचा पंढरपुरातील काळ आपल्यासमोर उभा केला आहे. या पुस्तकाला डॉक्टर रामचंद्र देखणे व डॉक्टर ताराबाई भवाळकर यांचे लिखित पुरस्कारही लाभले आहेत. श्री आनंद जाजू यांनी पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ तयार केले आहे. लोक कलाप्रेमी, स्त्री चळवळीशी संबंधित कार्यकर्ते , वारकरी संप्रदाय व अर्थातच सर्वसामान्य रसिक या सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

डॉ अनिल जोशी
९४२२६४७२८३
jaysss12@gmail.com ३०/०६/२०२१ .
“भारूडातील वादळ चंदाताई….”
लेखक: सीए पवनकुमार झंवर
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवराज गोर्ले यांच्या 'सर्वस्व' या पुस्तकाविषयी वाचकांच्या प्रतिक्रिया 

Shivraj Gorle

Shivraj Gorle

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मनस्विनी :  एक निर्मळ कादंबरी

Manaswini

अगदी सोप्या सुलभ अशा भाषेत 'अर्चना देव ' यांनी ' काशीबाई ' प्रत्यक्ष डोळ्यांसमोरच उभी केली. यापूर्वी इतकं सुंदर वर्णन (काशीबाइंचे व्यक्तिमत्त्व) कुठेच वाचले नाही आणि ऐकलेही नाही. काशीबाइंचा सहनशीलपणा, मनाचा मोठेपणा! मनातलं वादळ शांत ठेवून बाजीरावांशी संयमानं वागणं. बापरे! खरंच कौतुकास्पद आहे. मनाचा मोठेपणा तरी किती! मस्तानीचा मुलगा समशेर ह्याला सुद्धा पोटच्या मुलासारखीच वागणूक.

माहेरी श्रीमंतीत, लाडात वाढलेल्या लाडूबाई आणि पेशवीण झाल्यानंतरच्या काशीबाई हा प्रवास खूपच सुंदर रेखाटला आहे. त्यांच्या स्वभावातले अनेक पैलू लेखिकेने उलगडले आहेत. " काशीबाई म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारी पवित्र गंगाबाई " ही उपमा फार सुंदर आहे. केवळ नवर्‍याच्या किर्तीला, एका अपराजित योद्ध्याला डाग नको म्हणून काशीबाईने स्वतःच्या आईने सोडलेले वाक्बाण सुद्धा तितक्याच ताकदीने परतवून लावले. केवढा हा खंबीरपणा !

एकंदर ' मनस्विनी ' ही कादंबरी खरोखरच मनस्वी झाली हे.

 

- श्रीमती विजया मोहोळकर, पुणे

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Paramhans