नवरात्रीच्या नऊ खिरापती

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या महालक्ष्मी, सरस्वती आणि काली या ती रुपांचं वास्तव्य असतं अशी भारतीयांमध्ये श्रद्धा आहे. आजच्या काळानुसार ही श्रद्धा अंधश्रद्धा न होता डोळस श्रद्धा कशी होईल याचा विचार प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. म्हणजेच स्त्रीच्या या तीन रूपांचा खरा अर्थ पुढच्या पिढीला समजेल. कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्था ही गेली ८१ वर्षांपासून अतिशय दर्जेदार ग्रंथांचं प्रकाशन करत आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक या विषयांवर वैविध्यपूर्ण पुस्तकनिर्मिती हा संस्थेचा खास विशेष आहे. नवरात्रीनिमित्त निवडक नऊ पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तकांची अगदी थोडक्यात ओळख करून दिली आहे. या विषयाबरोबर आधुनिक स्त्रीचं विज्ञानदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या केलेलं चित्रणही दोन वेगळ्या पुस्तकांतून घडतं त्यांचीही ओळख हेतुत: करून दिली आहे.

Navratri Khirapat

नारी तू नारायणी – तेजस्विनी, ज्ञानी, कर्तृत्वसंपन्न अशा आदर्श माता, पत्नी, कन्या यांची छोटेखानी चरित्रे या पुस्तकात आहेत. ऐतिहासिक आणि पौराणिक काळातील स्त्रियांची ही चरित्रे आजच्या काळातील स्त्री पुरुषांना आत्मभान देणारी आहेत.

जौहराच्या ज्वाला – राजपुतान्यातील वीरांगनांच्या जौहाराच्या धगधगीत कथांचा हा संग्रह स्फुरण देणारा आहे. स्त्री ला स्त्री असण्याचा अभिमान देणारा हा संग्रह आहे.


लोकराज्ञी – पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांचं विलक्षण स्फूर्तिदायक असं हे जीवनचरित्र आहे. प्रेमळ माता, शिस्तशीर प्रशासक, उत्तम लढवय्या असणाऱ्या अहिल्याबाईंचं तेजस्वी चरित्र वाचकांना प्रेरक ठरतं.


अग्निशिखा - झाशीची राणी लक्ष्मीबाई या तीन शब्दांमधलं शौर्यच वाचकांना प्रेरक ठरतं. अशा महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला अभिमानास्पद अशा झाशीच्या राणीच्या जीवनावरील प्रेरक कादंबरी वाचकांना उत्साह देते.


पेशवेकुलीन स्त्रिया – इ. स. १७१४ ते १८१८ या १०४ वर्षांच्या कालखंडातील पेशवे घराण्याती कुलस्त्रियांची चरित्रे या पुस्तकात लिहिली आहेत. हा छोटेखानी चरित्रसंग्रह माहितीपूर्ण आहे.


अस्तपर्व – श्रीमंत बाकाबाईसाहेब भोसले या नागपूरच्या भोसले यांच्या घराण्यातील राणीसाहेब. यांच्या जीवनावरील ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी अतिशय उत्कंठावर्धक आहे.


कुलरक्षिता जिऊ – नाना फडणीसांच्या कुळातील वैशाली मोहन फडणीस यांनी लिहिलेली ही चरित्रात्मक कादंबरी वेगळी दृष्टी देते.
टेस्ट ट्यूब जन्मा – कृत्रिम गर्भधारणा या एका सूत्राभोवती गुंफलेल्या पाच दीर्घकथा या कथासंग्रहात आहेत. विज्ञानाची दृष्टी घेऊन स्त्रीकडे स्त्री म्हणून पाहण्याचा एक चांगला प्रयत्न असलेला हा कथासंग्रह आहे.


खऱ्याखुऱ्या गोष्टी – नीला सत्यनारायण यांचा हा भावस्पर्शी कथासंग्रह आहे. नीलाताईंना भेटलेल्या स्त्री पुरुषांच्या या कथा आहेत. जास्त करून स्त्रियांच्या कथा आहेत. नीलाताईंच्या लेखनातला सहजपणा आणि प्रामाणिकपणा यामुळे या कथा आपल्याला एक वेगळंच भावविश्र्व दाखवतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद या विभूतींवरील मौलिक ग्रंथसंपदा

परमहंस

Paramhans

युगावतार श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या अलौकिक जीवनावरील प्रेरक कादंबरी. श्री. परमहंस यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन व त्यांनी सुस्थापित केलेली मधुराभक्ती, ज्ञान व वैराग्य यांचा प्रसार व प्रचार करून जगाला आजही पथदर्शनकरीत आहे. अशा या ईश्र्वर अवतार दीपस्तंभाची ही अलौकिक, प्रासादिक कादंबरीमय जीवनगाथा.

विश्र्वगुरु भारत (मराठी व इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध)

Vishwaguru Bharat My Great India

स्वामी विवेकानंदांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक अशी मार्गक्रमणा स्वामीजींच्याच शब्दांत समजून घेण्यासाठी प्रस्तुत ग्रंथाची रचना आहे. या ग्रंथात स्वामींचे ३६५ विचार – एक दिवस – एक पान – एक विचार या नित्यवाचन सुलभ रीतीने करण्यासाठी प्रस्तुतचा हा ग्रंथ आहे.

मानवतेचा महापुजारी

Manavtecha Mahapujari

आजच्या काळातील तरुण पिढीला स्वामी विवेकानंदांचे यथार्थ स्वरूप कळावे यादृष्टीने या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. सध्याच्या परिस्थितीत तरुणांपुढे आदर्श म्हणून विवेकानंदांच्या या चरित्रग्रंथातून निश्र्चितच प्रेरणा मिळेल.

दिग्विजय

Digvijay

धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात भारतामध्ये आणि जागतिक पातळीवर एक क्रांतीच घडवून आणणाऱ्या विवेकानंदांसारख्या युगपुरुषाचे अवघे जीवन कादंबरीच्या माध्यमातून उभे करणे ही सोपी गोष्ट नाही. ही अवघड गोष्ट मुक्ता केणेकरांनी लीलया पेलली आहे हे या कादंबरीतून दिसून येते.

भारतीय संत

Bhartiya Sant

मुक्ता केणेकर यांच्या प्रस्तुत संतचरित्रग्रंथात स्वामी विवेकानंद यांच्यावर देखील लेख लिहिला आहे. प्रस्तुत ग्रंथ भारतातील विविध संतांच्या जीवन कार्याची महती सांगणारा आहे.

रामकृष्ण विवेकानंदांची निवेदिता

Nivedita

मार्गारेट नोबल या इंग्रज महिलेने स्वामी विवेकानंदांचे कार्य पुढे नेले. भगिनी निवेदिता हे नाव विवेकानंदांनी त्यांना दिले. त्याचबरोबर कार्यप्रेरणाही दिली. त्यांची चरितकहाणी केणेकर यांनी सांगितली आहे.

कलंक मतीचा झडो

Kalank

वा. ना. उत्पात यांच्या वैचारिक लेखांचा संग्रह यामध्ये दोन महत्त्वपूर्ण लेख स्वामी विवेकानंदांवर लिहिले आहेत. प्रस्तुत वैचारिक ग्रंथ अभ्यासकांना, रसिकवाचकांना विचारप्रवृत्त करणारा आहे.

रामकृष्ण आणि विवेकानंद

Ramrushna ani Vivekananda

रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचे आणि विचारांचे चिंतन प्रस्तुत चरित्रग्रंथात करंदीकर यांनी केले आहे. अतिशय अभ्यासपूर्ण आणि संदर्भमूल्य पुरवणारा असा हा चरित्रग्रंथ आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप

भूमंडळी

कॉन्टिनेन्टल प्रकाशन परिवारातर्फे छत्रपती शिवरायांना सादर वंदन

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

११ मार्च २०२० छत्रपती संभाजीराजे स्मृतिदिन सादर नमन

कॉन्टिनेन्टल प्रकाशित छत्रपती संभाजी महाराजांवरील महत्त्वपूर्ण पुस्तके

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

आवर्तन            

आपल्या हिंदू संस्कृतीत आवर्तन या संकल्पनेला नेहमीच खूप महत्व दिलेलं आहे .हिंदुस्थानी संगीतात  आवर्तन असते. तसेच एखादा मंत्र, स्तोत्र याचेही आवर्तन असते. परंतु आज मला आणखी एका महत्वाच्या आवर्तनाविषयी लिहायचे आहे

'आवर्तन' म्हणजे काय तर  एक चक्र, जिथे आरंभ  नाही, अंत नाही, जे चक्र सतत भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही काळातअविरतपणे सुरु आहे. जसं कि, आपल्या निसर्गातील ऋतुचक्रउन्हाळा -पावसाळा-हिवाळा देखील युगानुयुगे पुन्हा पुन्हा सुरु आहे . पाण्याच्या वाफेचे ढग होऊन पुन्हा ढगातून पावसाच्या रूपाने पाणी जमिनीवर येते. यातही सातत्य आहे, आणि यालाही अंत नाही. झाडापासून बी होते, पुन्हा बी पासून झाड, त्याचप्रमाणे, जसं आपण लहानपणी कोंबडी आधी  कि अंड आधी असं  कोडं घालायचो, त्याप्रमाणेच या चक्राचा  सुरुवात आणि शेवट शोधायचं म्हणलं तर खरंच अशक्यप्राय आहे. 

तसंच जन्म - मृत्यूचे चक्र देखील अविरतपणे सुरु आहे. आपल्या आत्म्याचाआरंभ हि कोणी सांगू शकत नाही आणि अंतही नाही . आपल्या आत्म्याचे अस्तित्वकाल हि होते, आजही आहे, अन उद्याही असणार आहे. आपण युगानुयुगे जन्मघेतोय, बाल्यावस्था , कुमारावस्था, तारुण्य, वार्धक्य या सर्वअवस्थांतून जाऊन हा देह सोडतो आहे , मग पुन्हा दुसरा देह धारण करून, पुन्हा याच चार अवस्थांची पुनरावृत्ती होते आहे. 

 काळालादेखील कालचक्र असेच म्हणलंय, भूतकाळ तर आहेच, परंतु वर्तमान आणिभविष्याचा देखील कधी ना कधी भूतकाळ होतो व जसा वर्तमान व भविष्याचे रूपांतरभूतकाळात होत जाते तसं नवीन वर्तमान व भविष्यकाळ येतंच राहतो, हि काळाचीपुनरावृत्ती देखील अनेक युगे सुरूच आहे, हे सर्वात मोठे काळाचे आवर्तन आहे

 या आवर्तनात आपण सर्वच गुंतलेलो आहोत, हेएखाद्या कोड्याप्रमाणे आहेयाचा अंत आपल्याला माहिती नाही  म्हणूनच हे  आवर्तन अपूर्ण आहे    हे आवर्तन  भेदून याच्या पल्याड ईशावास्य उपनिषदात  वर्णन केलेले पूर्णत्व आहे जे  कधी वाढतही नाही वा घटत ही नाही, ते स्थिर आहे. 

शेवटी आपल्या सारख्या सामान्य मानवाला  हे आवर्तन भेदणं कठीण असलं तरी, ज्ञान  (wisdom)  आणि ध्यानाच्या (meditation) च्या  साथीने निदान आपणया पूर्णत्वाच्या (completeness) मार्गावर एखादे पाऊल तरी  टाकूनआत्मज्ञानाची enlightenment  अनुभूती नक्कीच घेऊ शकतो.

- तन्वी टापरे

याविषयासाठी उपयुक्त आणि मार्गदर्शनपर ठरतील अशी दोन पुस्तकं कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केली आहेत.

आत्ता नाही तर केव्हा…? - स्मिता जयकर

Atta nahi

साधनेच्या सोपानाने ईश्र्वरी सत्याकडे जाताना आलेले आत्मानुभव स्मिता जयकर यांनी अतिशय भावपूर्णतेने या पुस्तकातून सांगितले आहेत. स्वत:कडे बघण्याची दृष्टी बदलेल असा विश्र्वास त्या या पुस्तकातून वाचकाला देतात. सकारात्मकता निर्माण करणारे हे पुस्तक आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्र्चात जीवन

Mrutupaschat

पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आणि एनर्जी हीलर म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. मेधा खासगीवाले यांचे हे पुस्तक आयुष्य खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण कसं जगता येऊ शकते याविषयीचं चिंतन मांडणारं आहे. माणसाचं अस्तित्व आणि त्याचे दृष्य-अदृष्य पैलू तसंच मृत्युनंतरचं त्याचं जीवन या साऱ्याचं चिंतनात्मक विवेचन करणारं हे पुस्तक आहे.

-----------------------------------------------------------------------------------------