Book Categories


जागतिक पुस्तक दिन

जागतिक पुस्तक दिन

जागतिक पुस्तक दिन नुकताच झाला . मी वाचलेली आणि त्यातील माझी आवडीची काही पुस्तके आणि लेखक , कवी हे सर्व जण माझे फॅमिली मेंबर्स ,फ्रेंड्स आहेत अशी माझी श्रद्धा आहे . कारण माझ्या आनंदात , दुःखात एवढंच काय कधी घरी एकटी असेन तेव्हा देखील मला या पुस्तकांनी साथ दिलीये . माझ्या सोबत आनंद celebrate केला तसंच माझ्या एकटेपणात मला मार्ग देखील दाखवला . स्वतः बद्दल आत्मविश्वासही दिला आणि
काही चुका सुधारण्यास मदतही केली .
जीवनातील अनेकविध रंग या पुस्तकांनी मला दाखवले . graduation पर्यंत literature मधले काही कवी , नाटककार परीक्षेच्या निमित्ताने का होईना पण अभ्यासायला मिळाले.Aristotle च्या poetics ने philosophy शी ओळख करून दिली. john done च्या प्रेम कविता , jane austen ची pride & prejudice आणि Emma हि romantic पुस्तकं मला नेहमीच refreshing mode वरती घेऊन गेली. मराठीत तर अनेक आहेत , बोरकरांपासून संदीप खरे पर्यंत चे कवी आणि दुर्गा भागवत यांचा पासून ते प्रिया तेंडुलकर पर्यंत च्या ललित लेखकांनी पावलो पावली चांगल्या विचारांच्या बागा फुलवल्या .
मग मध्यंतरी भर पडली ती अध्यात्मिक पुस्तकांची . Dr प.वि वर्तक यांच्या ' उपनिषदांचे विज्ञान निष्ठ निरूपण ' या २ खंडांमुळे अध्यात्मशास्त्र हे किती समृद्ध आहे याची पुरेपूर प्रचिती आली आणि यांच्या साहाय्याने निदान अध्यात्माची एक तरी पायरी चढता आली .
अव्यक्त भावनांना शब्दांच्या माध्यमातून कशी वाट करून द्यावी हे या पुस्तकांनीच मला शिकवलं . या सर्व साहित्यिक आणि पुस्तकांचे आशीर्वाद माझ्या वर राहून वेळोवेळी माझ्या शब्दसंपदेत आणि ज्ञानात योग्य ती भर पडून मला चिकटलेल्या काही चुकीच्या समजुतीचे रूपांतर शब्दांसोबतच्या मैत्री मध्ये व्हावे अशीच आशा आहे .

- तन्वी .