Book Categories


विश्वशांती

विश्वशांती

विश्वशांती 

- तन्वी टापरे

आज विश्वशांती दिन (international day of peace) आहे . आज जी आपण global peace हि term वापरतो , त्या बद्दल संत ज्ञानेश्वरांनी कित्येक शे वर्षा पासून आपल्या पसायदाना मध्ये लिहून ठेवलंय . यात समस्त मानव जाती साठी आणि विश्व् शांती साठी प्रार्थना केलेली आहे . 

मानसिक शांती (inner peace ) पासून जागतिक शांतते पर्यंत चा प्रवास हा चढत्या क्रमाने होतो .
मध्यंतरी उपनिषदा मध्ये असलेल्या त्रिवार शांती विषयी वाचनात आलं ( प्रत्येक उपनिषदाचा एक शांती मंत्र असतो , त्याची समाप्ती या त्रिवार शांती ने केली जाते , ओम शांती: शांती: शांती: )

1. अधिभौतिक शांती - शारीरिक व्याधी असतील तर मन अशांत असते म्हणून हि प्रार्थना कि आमचे शरीर तुष्ट व शांत राहो .

2. अध्यात्मिक शांती - यात अशी प्रार्थना कि मनुष्य जातीतील परस्पर संबंध सलोख्याचे व शांती चे राहो .

3. अधी दैविक शांती - हि शांती म्हणजे वैश्विक शांती . सर्वांचे कल्याण होवो व सर्वांच्या कल्याणातून माझे कल्याण होवो हि प्रार्थना .
अशा या विश्व् शांती साठी स्वत: पासूनच प्रारंभ करूयात आणि समग्र मानव जातीच्या कल्याणा साठी सिंहाचा वाटा अशक्य असला तरी खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न करत राहूयात .

|| ओम शांती: शांती: शांती: ||

__________________________________________________________________________________

या विषयावर कॉन्टिनेन्टल प्रकाशनची पुस्तके 

Vishwaguru Bharat

Manavata Dharma