Book Categories


७ ऑक्टोबर २०१७ : आत्ता नाही तर केव्हा?...

७ ऑक्टोबर २०१७ : आत्ता नाही तर केव्हा?...

स्मिता जयकर – भावानुवाद : नीला सत्यनारायण प्रकाशन सोहळा ॲड. स्मिता जयकर लिखित ‘‘आत्ता नाही तर केव्हा?...’’ या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक ७ ऑक्टोबर २०१७, शनिवार रोजी बोट क्लब येथे झाले. या पुस्तकाचा भावानुवाद निवृत्त सनदी अधिकारी माननीय नीला सत्यनारायण यांनी केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी व ॲक्सिस बँकेच्या अध्यक्षा माननीय अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी भाषण केले. मा. अमृता फडणवीस यांनीही मनोगत व्यक्त केले. कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे अमृता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.