Subcategories
शेतक-याच्या दुर्दशेतील महत्त्वाची समस्या म्हणजे 'पाणी'. 'तहान' ही ग्रामीण समाजाच्या वास्तवतेचे बोलके प्रतीक आहे. पाण्याची तहान किंबहुना जीवन जगण्याची तहान याचं भेदक आणि स्पष्ट रूप या कादंबरीतून दिसतं.
Viewसैबेरियात तुरुंगवास भोगण्यापूर्वीच्या कालखंडात दस्तयेवस्कीने ही कादंबरिका लिहिली. मानवी मनातल्या एकूण गुंतागुंतीचे चित्रण त्याने कोझाक्यात केले आहे.
Viewमहाभारताच्या ‘वनपर्व’ या पर्वातील नल-दमयंतीच्या कथेवर आधारित ‘सहचरी’ ही कादंबरी आहे. यामध्ये नल राजाचे राजसी व्यक्तिमत्त्व सांगण्यापेक्षा त्याच्या गृहस्थजीवनाची कथा सांगितली आहे. पती म्हणून वावरताना त्याच्या वागण्याचे विविध पैल दिसतात. हे या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल.
Viewशतकानुशतके लोटली तरी भारतीयांच्या मनात राणी पद्मिनी ही कायम घर करून राहिली आहे. राणा प्रतापची हल्दीघाटातील लढाई हे भारतीय शौर्याचे प्रतीक आहे तर राणी पद्मिनीचा जोहर हे स्त्रीत्वाच्या सन्मानाचे प्रतीक आहे.
Viewस्वप्नात येणाऱ्या निद्रिस्त क्षण पकडून तिच्या पात्रातून सर्व मनोकामना पूर्ण करणारा जीवाश्म उचकटून काढण्याचा ध्यास विलीये या वनरक्षकाला लागतो. वाचक नागालँडच्या अद्भूतरम्य शक्तींनी व नैसर्गिक संपदेनी समृद्ध आणि अगम्य जंगलांत वनरक्षकाच्या सोबत वावरतो.
Viewथोमास मेले गेली कित्येक वर्षे उन्मादाची अवस्था आणि नैराश्य या भावविकृतीचे रुग्ण आहेत. त्यालाच उभयवस्था अथवा बाय-पोलर डिसऑर्डर म्हटले जाते. ते त्याचीच गोष्ट सांगत आहेत.
View‘मी याज्ञसेनी’ ही द्रौपदीच्या जीवनावरील चरित्र-कादंबरी आहे. द्रौपदी ही पांडवपत्नी आहे, साम्राज्ञी आहे; पण त्या आधी ती एक स्त्री आहे याचा विचार सुधाकर शुक्ल यांनी या कादंबरीतून केल्याचे जाणवते. महाराणी द्रौपदीची कथा सांगत असताना एका स्त्रीची वेदना पोहोचवण्याकडे सुधाकर शुक्ल यांचा कल दिसतो.
Viewआकाश, भूमि आणि शेतकरी हे सृजनाचे त्रिसूत्र आहे! यांच्या आपसातील सहकार्यानेच झाडाला फळ येते, रोपांना धान्य धरते. ही त्रिसूत्री कथा या कादंबरीतून येते.
View‘काशीबाई’ या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम होते. एका अपराजित योद्ध्याच्या त्या धर्मपत्नी. त्या सालस, सदाचारी, समंजस होत्या. बाजीराव-मस्तानी यांची प्रेमकथा सर्वांनाच ज्ञात आहे. एका वीरपुरुषाचे तेजोमय, स्फूर्तीमय क्षात्रतेज झाकोळून जाऊ नये म्हणून पतीची आणि हो.. मस्तानीचीही पाठराखण त्यांनी केली. त्यांचा जीवनपट आणि गुणवैशिष्ट्ये उलगडायचा प्रयत्न या कादंबरीतून...
View‘ड्रग कोर्टल’सारख्या गंभीर, गूढ विषयावरची ही कादंबरी या व्यवसायाची भीषणता दाहकपणे दाखवते. ही दाहकता तरुण पिढीला भान देण्यासाठी आवश्यक आहे असे कादंबरी वाचताना वाटत राहते. या कादंबरीत लेखकाने सत्यघटना आणि काल्पनिकता यांचा कुशलतेने संयोग साधून कथानकाची मांडणी केली आहे. एखादा शिस्तबद्ध ‘ॲक्शनपट’ पाहात असल्याची जाणीव ‘सिनालोआ’ कादंबरी करून देते.
View