आपल्या कृषिनिष्ठ मूल्यजाणिवांशी प्रामाणिक राहून सदानंद देशमुख यांनी आपल्या आयुष्याच्या वळणावरील अनुभव या कवितांमधून मुक्तपणे उधळून दिल्याचे दिसून येते.
Viewकविता वाचाविशी वाटणे अगर लिहाविशी वाटणे, हे संवेदनशील मनाचे लक्षण! ही संवेदनशीलता वर्षाताईंना लाभली आहे. त्यांना जाणवणारे अनेक वैयक्तिक आणि सामजिक संदर्भ त्यांच्या कवितेतून व्यक्त होतात.
Viewप्रत्येक कविता म्हणजे सोनचाफ्याचे सुगंधी फूलच आहे म्हणून ही नव्वद सोनचाफ्यांची फुले सर्वांच्या मनात सुगंध दरवळून मन प्रसन्न करतील. - डॉ. (श्रीमती) स्नेहलता देखमुख माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
View‘उतरंड’ या कवितासंग्रहातून उगवणाऱ्या चित्कारहाका स्त्रीच्या आहेत. पुरुषांच्या वर्चस्वशाहीने पूर्णत: अप्रतिष्ठित करून ठेवलेल्या गर्भाशयाच्या पुनर्प्रतिष्ठेसाठी एक जीवनोपकारक भान ही कविता जीवनाच्या वेशीवर उभे करीत आहे.
Viewउमर खय्यामपासून मार्क्सपर्यंत जगात होऊन गेलेल्या अनेक कलावंतांचे व द्रष्ट्यांचे संस्कार कुसुमाग्रजांच्या प्रतिभेवर झाले असले तरी ते त्यांनी पचविले आहेत-आत्मसात केले आहेत. त्यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह मराठी कवितेचे एक भूषण मानला जावा इतका सरस आहे.
View‘चांद माझा’, ‘वादळवेल’, ‘यमके’, ‘माघारी’ यांसारख्या अनेक घनगंभीर कविता प्रस्तुत काव्यसंग्रहात आहेत. कुसुमाग्रजांची सारी भाषिक वैशिष्ट्ये याही काव्यसंग्रहातून जाणवतात.
View