दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नरसंहारातून २५०० मुलांना वाचवणाऱ्या इरेना सेंडलर या पोलीश स्त्रीची सत्य कहाणी
Viewमा. मेरी क्यूरी या वैज्ञानिक संशोधिकेची जीवन-कहाणी जितकी ओजस्वी तितकीच मनोरम आहे. मूळ फ्रेंचमध्ये तिची मुलगी ईव्ह क्यूरी हिने ती हृदयस्पर्शी भाषेत वर्णन केली आहे. इंग्रजीत तिचे भाषांतर झाले आहे. त्या आधारे ही कहाणी लेखकाने मराठीत आपल्या लेखणीतून उतरवीली आहे.
Viewदुर्गाबाई देशमुखांच्या ‘चिंतामण ॲण्ड आय’ या इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद कुसुम कुलकर्णी यांनी केला आहे. चिंतामणराव देशमुख व दुर्गाबाई देशमुख या राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुप्रसिद्ध दांपत्याचं परिपूर्ण जीवनचरित्र वाचकांना, कार्यकर्त्यांना प्रेरक ठरते.
Viewमाजी सी. बी. आय. संचालक जोगिंदरसिंग यांच्या पुस्तकाचा अनुवाद वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी केला आहे. पोलिसक्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रस्तुत पुस्तक मार्गदर्शक आहेच परंतु वाचकांसाठीही हे पुस्तक कुतूहल निर्माण करणारे रंजक झाले आहे.
Viewदेशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या बलिदानाची ही कथा आहे. कारागृहातल्या अनन्वित यातनांची ‘माझी जन्मठेप’ ही भयंकर कहाणी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘माझ्या जन्मठेप’ची ही संक्षिप्त आवृत्ती प्र. के. अत्रे यांनी संपादित केली आहे. महान ध्येयांच्या सिद्धीसाठी माणूस दु:खांचे आणि संकटांचे हलाहल कुठपर्यंत पचवू शकतो हे प्रस्तुत पुस्तक म्हणजे जणू काही...
Viewकु. सायली ही एक डाऊन सिंड्रोम असलेली असामान्य मुलगी आहे. पण आज तिने सामान्य मुलींपेक्षाही चांगली कामगिरी केली आहे. शारीरिक मर्यादांबरोबर असंख्य अडथळ्यांवर मात करून सायली एक कथ्थक आणि पाश्र्चात्य शैलीतील यशस्वी नृत्यांगना म्हणून ओळखली जाते.
Viewसौंदर्याला अभिनयाचा शाप असतो. असं ऐकलं होतं म्हणजे फार सुंदर चेहऱ्यांना अभिनय फारसा जमत नाही किंवा फार सुंदर अभिनय करणाऱ्यांकडे देखणा चेहरा असतोच असं नाही. शशी कपूर मात्र याला सणसणीत अपवाद असणाऱ्या मोजक्याच नटांच्या पंक्तीत बसणारा! त्याची रंगमंचावरची कारकीर्द, त्याचे इंग्लिश सिनेमे अशा वेगवेगळ्या पैलूंची माहिती देणारं हे रंजक पुस्तक!
Viewहिंदी चित्रपटसृष्टी संगीताच्या तालावर डोलते. गाणी लोकप्रिय झाली की चित्रपट हिट हे इथलं सर्वमान्य मिथक... 1930 एफएल 2000 या कालखंडामध्ये विविध संगीतकार आपलं सर्वस्व पणाला लावून धून बांधत होते. ‘गंधार निषाद’ म्हणजे अशा संगीतकारांचा सुरेल जीवनप्रवास...
View