Cancer : Nidan, Upchar Va Pratibandh View larger

Cancer : Nidan, Upchar Va Pratibandh

New product

प्रा. डॉ. यशवंत तोरो हे विलिंग्डन कॉलेज, सांगली व फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून केलेल्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्यावर गेली दहा वर्षे ते मिरज येथील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मध्ये सुरुवातीस मुख्य प्रशासकिय अधिकारी व सध्या संचालक (व्यवस्थापन व संशोधन) म्हणून कार्यरत आहेत.
या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना कॅन्सरमुळे जर्जर झालेल्या अनेक रुग्णांशी झालेल्या वार्तालापातून त्यांच्या हे ध्यानात आले की, या रुग्णांना, त्यांच्या मित्रांना व नातेवाईकांना सहज सोप्या मराठी भाषेतून या रोगाची सर्वांगिण माहिती देणे गरजेचे आहे. हे पुस्तक त्यांनी कॅन्सरग्रस्त रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी लिहिले आहे. या पुस्तकामध्ये कर्करोगांची चिन्हे व लक्षणे, कर्करोग होण्याची कारणे, निदान, चाचण्या सर्व प्रचलीत उपचार पद्धती, कर्करोगाचा प्रतिबंध, प्रतिबंधात आहाराचे महत्त्व, पर्यायी व पूरक उपचार पद्धती, भविष्यातील कॅन्सर निदान व उपचार पद्धती, कॅन्सरग्रस्त रूग्णांना आर्थिक मदत देणाऱ्या संस्थांची माहिती आणि रूग्ण व नातेवाईकांना सामान्यपणे पडणारे प्रश्न व त्यांची उत्तरे याचा सविस्तर उहापोह या पुस्तकात केला आहे.

  • Author Dr. Yashwant Toro
  • Weight 477gms
  • Pages 384
  • Book Size Demi

30 other products in the same category: